शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 2:49 PM

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडे घातक हत्यारे आढळून आली

पिंपरी : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला दिघी पोलिसांनीअटक करून दरोड्याचा डाव उधळून लावला. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्री अकराच्या सुमारास भोसरी-आळंदी रोडवर दिघी येथे घडली .  कुंडलिक देवराम शेखरे (वय २४), रामेश्वर सोपान पांचाळ (वय २८), शुभम विठ्ठल निर्मळे (वय २२), रुपेश ज्ञानेश्वर देवकर (वय २४), गजानन प्रेमराव फाजगे (वय १९) व दयानंद महादेव सुरवसे (वय १९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई गणेश कोकणे यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी आळंदी रस्त्यावर काहीजण उद्यानाच्या समोर दुचाकीवर संशयितरित्या थांबले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीची तपासणी केली असता त्यामध्ये घातक हत्यारे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी तीन दुचाकी, दोन तलवारी, एक लोखंडी पालघन, तीन लोखंडी कोयते, सहा मास्क असा एकूण ८१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता ते भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याची कबुली त्यांनी दिली. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस