''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:36 IST2018-08-14T16:00:59+5:302018-08-14T16:36:44+5:30

१६ लाख रुपये, एक लाखाची व्हिस्की देखील जप्त करण्यात आली आहे. 

Gambling racket bursted in the five-star hotel by mumbai police, 42 people were taken into custody | ''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात

''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात

मुंबई - सांताक्रूझ विमानतळ परिसरातील ''सहारा स्टार'' या  पंचतारांकित हॉटेलमध्ये गुन्हे शाखेने मंगळवारी धाड टाकली. या धाडीदरम्यान तेथे जुगार खेळला जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी ४२ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या ४२ जणांपैकी ५ जण सट्टेबाज असल्याची माहिती समोर आली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेऊन मुंबई पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकली. यावेळी ५ सट्टेबाजांसह ४२ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच १६ लाख रुपये, एक लाखाची व्हिस्की देखील जप्त करण्यात आली आहे.

''सहारा स्टार'' या पंचतारांकित हॉटेलमध्ये उच्चभ्रू लोकांचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हॉटेलच्या एका रूमच्या बाहेरच्या बाजूस कानोसा घेतला असता पोलिसांना हॉटलातील बुक केलेल्या दोन रूममध्ये एकूण ४२ लोक एकत्रितपणे पैसे आणि कॉईनच्या माध्यमातून फ्लॅश नावाचा जुगार खेळताना सापडले. त्यांच्या ताब्यातून एकूण १६ लाख २४ हजार ३२५ रोख रक्कम, २७ हजार ६६२ किंमतीचे जुगार खेळण्याचे साहित्य आणि १ लाख ४५०० रुपयांच्या महागड्या स्कॉच व्हिस्कीच्या बॉटल्स पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.  

Web Title: Gambling racket bursted in the five-star hotel by mumbai police, 42 people were taken into custody