घरात घुसले, मग खाली येऊन गोळ्या झाडल्या; खासगी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:31 IST2026-03-07T19:17:53+5:302026-03-07T19:31:56+5:30

नोएडात एका व्यावसायिकाची कुटुंबियासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

From Marriage Proposal to Murder Man Shot Dead for Leaking Lover Private Videos After Wedding Dispute | घरात घुसले, मग खाली येऊन गोळ्या झाडल्या; खासगी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरची हत्या

घरात घुसले, मग खाली येऊन गोळ्या झाडल्या; खासगी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरची हत्या

Noida Crime: देशभरात होळी साजरी होत असताना नोएडात एक हादरवणारी घटना घडली. नोएडातील सेक्टर-७५ मधील आयव्हीवाय काउंटी सोसायटीत  एका नामांकित प्रॉपर्टी डीलरची त्याच्या पत्नी आणि मुलांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मृताची प्रेयसी, तिचे दोन भाऊ आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली असून, या हत्येमागे प्रेमसंबंध आणि सूडाचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

मयत साहिल सिंघल हा त्याची पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांसह सोसायटीत राहत होता. गेल्या चार वर्षांपासून त्याचे गाझियाबादमधील प्रिया सोलंकी हिच्याशी प्रेमसंबंध होते. बुधवारी प्रिया तिचे दोन भाऊ निखिल, लब्बू आणि एका शेजारील अल्पवयीन मुलासह साहिलला भेटायला त्याच्या सोसायटीत पोहोचली होती. महत्त्वाचे म्हणजे, साहिलनेच या चौघांना सोसायटीत एन्ट्री मिळवून दिली होती.

लग्नाची मागणी आणि व्हायरल व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे काही कारणे होती. साहिल आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच १८ फेब्रुवारीला प्रियाशी लग्न करणार होता. मात्र, साहिलने अद्याप घटस्फोट घेतला नसल्याचे समजताच प्रियाने लग्नास नकार दिला. लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या साहिलने प्रियाचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याच गोष्टीचा राग प्रियाच्या भावांच्या मनात होता.

आईने अडवले, पत्नीसमोर संपवले!

होळीच्या दिवशी दुपारी हे चौघेही साहिलच्या फ्लॅटवर पोहोचले. तिथे साहिलची आई सीमा सिंघल यांनी त्यांना घरात शिरण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांना समजले की साहिल खाली आपल्या पत्नीसोबत होळी खेळत आहे. खाली पोहोचल्यावर पुन्हा एकदा लग्नावरून आणि व्हायरल व्हिडिओवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या निखिलने पिस्तूल काढून साहिलवर थेट गोळ्या झाडल्या. साहिलच्या छातीत तीन गोळ्या लागल्या आणि पत्नीसमोरच तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांची कारवाई
सेक्टर-११३ पोलीस ठाण्याच्या पथकाने वेगाने तपास चक्रे फिरवून तिन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे. यासोबतच एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र आणि कारही जप्त केली आहे.

Web Title : वायरल वीडियो पर प्रॉपर्टी डीलर की गोली मारकर हत्या, प्रेम त्रिकोण।

Web Summary : नोएडा में प्रॉपर्टी डीलर साहिल सिंघल की प्रेम संबंध और वायरल वीडियो के चलते परिवार के सामने हत्या कर दी गई। उसकी प्रेमिका, उसके भाई और एक नाबालिग को गिरफ्तार किया गया है। हत्या का कारण साहिल द्वारा शादी से इनकार करने पर उसके निजी वीडियो लीक करना था।

Web Title : Property dealer shot dead over viral video, love triangle.

Web Summary : Noida property dealer Sahil Singhal was murdered in front of his family over a love affair and a viral video. His girlfriend, her brothers, and a minor have been arrested. The murder stemmed from a dispute after Sahil allegedly leaked her private videos when she refused to marry him.