Appवर मैत्री; Whats Appवर अश्लील चॅट; नंतर नग्न व्हिडिओ पाठवण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 20:59 IST2021-05-28T20:57:54+5:302021-05-28T20:59:30+5:30
Threatened to send nude videos : पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी महिलेला अश्लील गप्पा मारण्यास भाग पाडले. यानंतर दोन्ही महिलांनी अश्लील संदेश, फोटो आणि व्हिडिओ पाठविणे सुरू केले. यासह स्क्रीन रेकॉर्डरच्या मदतीने आरोपींनी महिलेची व्हिडिओ चॅटही रेकॉर्ड केली आहे.

Appवर मैत्री; Whats Appवर अश्लील चॅट; नंतर नग्न व्हिडिओ पाठवण्याची दिली धमकी
भोपाळ - कोलार भागात राहणार्या महिलेचा नग्न व्हिडिओ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उघड झाला आहे. याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. तपास अधिकारी प्रेक्षा मौर्य यांनी सांगितले की, २५ वर्षीय महिलेने जानेवारीत आपल्या स्मार्ट फोनवर एक ऍप डाउनलोड केला. तिने अॅप्सद्वारे पैसे मिळवण्यासाठी वेब होस्टिंग सुरू केली आणि घरून काम सुरु केले.
पोलिसांनी सांगितले की, या दरम्यान ही महिला आरोपीच्या संपर्कात आली. वेब होस्टिंग दरम्यान दोन लोक मित्र बनले. या महिलेने आरोपीला सांगितले की, माझा नवरा मद्यपान करून माझ्यावर अत्याचार करतो. तसेच मला शिवीगाळ करतो. त्यानंतर दोघजणांनी महिलेला व्हॉट्सअॅप कॉल करण्यास सुरवात केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी महिलेला अश्लील गप्पा मारण्यास भाग पाडले. यानंतर दोन्ही महिलांनी अश्लील संदेश, फोटो आणि व्हिडिओ पाठविणे सुरू केले. यासह स्क्रीन रेकॉर्डरच्या मदतीने आरोपींनी महिलेची व्हिडिओ चॅटही रेकॉर्ड केली आहे.
पत्नीने पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले; बाहेर लावले कुलूप मग काय... https://t.co/eNsxQYv2gK
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2021
त्यानंतर आरोपीने महिलेवर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. तसेच तसे नाही केल्यास तिचा नग्न व्हिडिओ सोशल साइटवर शेअर करू अशी धमकी देणे सुरू केले. त्यानंतर महिलेने तिच्या नवऱ्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिलेने नवऱ्याला याबाबत माहिती दिली. त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने आरोपींना कॉल केल्यांनतर त्याला देखील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
२३ मे रोजी आरोपीने महिलेच्या नवीन नंबरवर नग्न व्हिडिओ पाठविला. त्यांनी महिलेच्या पती आणि त्याच्या अनेक नातेवाईकांना व्हिडिओ पाठविले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपींविरोधात चौकशी सुरू केली आहे.