A friend also stole a photo and blackmailed and sexually abused a minor girl | मित्रानेही चोरुन फोटो काढले अन् ब्लॅकमेल करत अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

मित्रानेही चोरुन फोटो काढले अन् ब्लॅकमेल करत अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देयाप्रकरणी तेजस दिलीप सोनवणे (२०) व चेतन पितांबर सोनार (२०) या दोघांविरुध्द बुधवारी रात्री शनी पेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एकाने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्याचवेळी दुसऱ्याने धूर्तपणे दोघांचे मोबाईलमध्ये फोटो काढले व काही दिवसांनी हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तेजस दिलीप सोनवणे (२०) व चेतन पितांबर सोनार (२०) या दोघांविरुध्द बुधवारी रात्री शनी पेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गल्लीतील राहणाºया तेजस दिलीप सोनवणे याच्यावर प्रेम होते. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी मुलगी दहावीचा निकाल घेऊन घरी परत जात असतांना तेजस सोनवणे हा तिच्याजवळ आला. त्यावेळी तेजसचा मित्र चेतन पितांबर सोनार हा देखील होता. तेजसने मुलीला दुचाकीवर बसवून कोल्हे हिल्स टेकडीवर नेले, तेथे गप्पा मारल्या. त्यांच्या पाठोपाठ चेतनही दुचाकीने कोल्हे हिल्सवर पोहचला. पीडिता आणि तेजसच्या गप्पानंतर एका इमारतीच्या आडोश्याला तेजसने पीडितेवर बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. याचवेळी चेतने मोबाईलमध्ये चोरुन फोटो काढले. याप्रकारामुळे पीडिताने तेजसशी बोलणे बंद केले होते. दोघांचे बोलणे बंद झाल्याचा गैरफायदा घेत चेतन सोनार याने पिडीतेशी मैत्री वाढविली. वर्षभर चाललेल्या मैत्रीनंतर चेतनने पिडीतेला गोड बोलून फेब्रुवारी २०२० (नक्की तारीख माहिती नाही) मध्ये पुन्हा कोल्हे हिल्स येथे नेले. तेथे यापूर्वी तेजसने केलेल्या बलात्काराचे फोटो दाखविले. हे फोटो पाहून अल्पवयीन मुलीला धक्काच बसला. ‘मलाही शरीर संबंध प्रस्थापित करु दे, नाहीतर  हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, तुझ्या घरच्यांचे मोठे नुकसान करेल’ अशी धमकी दिली. यावेळी चेतननेही  बलात्कार केला. तोपर्यंत ही घटना मुलीने आई वडीलांना सांगितलेली नव्हती.

संशयित राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार यांनी  मुलीच्या नावाने शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. फोटोची धमकी देवून पुन्हा दोघांसोबत संबंध ठेवण्याबाबत दबाव टाकत होते. हे सर्व असह्य झाल्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार पीडित मुलीने आईवडीलांना सांगितला. बुधवारी रात्री मुलीच्या फिर्यादीवरुन शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार यांच्याविरुध्द बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित आरोपी तेजस सोनवणे हा शहरातील एका राजकीय पक्षाच्या  महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे

आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना
गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच दोघंही संशयित फरार

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

Web Title: A friend also stole a photo and blackmailed and sexually abused a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.