शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीवर टाच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 6:48 PM

नॅबने पीर सोहवामधील एक कॉटेज आणि व्हिला तसेच चिनिओटमध्ये आणखी दोन भूखंड जप्त केले आहेत.

ठळक मुद्देशाहबाज शरीफ आणि त्यांचा ममुलगा हमजा आणि सुलेमान यांच्या २३ मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. मनी लाउंडरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

लाहोर - पाकिस्तानमधील लाहोर येथे नॅबने (नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरो) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा लहान भाऊ आणि पंजाबचे (पाकिस्तान) माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. नॅबने मंगळवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ आणि त्यांचा ममुलगा हमजा आणि सुलेमान यांच्या २३ मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. मनी लाउंडरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

शाहबाज, हमजा, सुलेमान आणि इतरांवर भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली केलेल्या तपासात असे आढळले आहे की शहबाजने आपल्या पत्नी नुसरत शाहबाज शरीफ आणि देहमिना दुरानी यांच्या नावे मालमत्ता मिळवली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांपैकी लाहोरच्या जोहर टाउनमधील नऊ भूखंड, ज्युडिशियल कॉलनीतील चार, मॉडेल टाऊनमधील दोन घरे आणि डीएचएमधील अनेक घरे आहेत. शिवाय, नॅबने पीर सोहवामधील एक कॉटेज आणि व्हिला तसेच चिनिओटमध्ये आणखी दोन भूखंड जप्त केले आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानChief Ministerमुख्यमंत्रीNawaz Sharifनवाज शरीफ