तात्पुरत्या कारागृहात कैद्यांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी; एकाने दुसऱ्याचे फोडले डोके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 14:45 IST2020-11-09T14:43:36+5:302020-11-09T14:45:34+5:30

कसा केला गुन्हा यावरुन झाला होता वाद

Free style fighting among between two criminals in temporary prisons; One smashed the other's head | तात्पुरत्या कारागृहात कैद्यांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी; एकाने दुसऱ्याचे फोडले डोके 

तात्पुरत्या कारागृहात कैद्यांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी; एकाने दुसऱ्याचे फोडले डोके 

पुणे : तात्पुरत्या कारागृहात असलेल्या दोघा न्यायालयीन बंद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात अ‍ॅल्युमिनियमची थाळीने मारुन जखमी केले. 

याप्रकरणी येरवडापोलिसांनी तेजस तुकाराम येनपुरे (वय १९, रा. तात्पुरते कारागृह बार्टी, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. 
याप्रकरणी कारागृह कर्मचारी सत्वशिल पाटील (वय ३०, रा़ जेल वसाहत, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहात नवीन न्यायालयीन बंद्यांना ठेवले जात नाही. त्यांच्यासाठी बार्टी येथे तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. सोहेल इसाक शेख (वय १९) व तेजस येनपुरे या दोघांना एकाच खोलीत ठेवण्यात आले होते. ७ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तेजस याने सोहेल शेख याला तु गुन्हा कसा केलास असे वारंवार विचारले. त्यावर सोहेल याने त्याला माहिती दिली. तरीही तेजस याने सोहेल याला तू खोटे बोलत आहेस असे म्हणाला. त्यानंतर तेजस याने सोहेल याला हाताना मारहाण करुन त्याच्याजवळील जेवणासाठी दिलेले अ‍ॅल्युमिनियमच्या थाळीने सोहेलच्या डोक्यात मारुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन बनसवडे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Free style fighting among between two criminals in temporary prisons; One smashed the other's head