Fraudulent duped 17 crore rupees in the name of employees | कर्मचाऱ्यांच्या नावे १७ कोटींचा भामट्याने घातला गंडा  
कर्मचाऱ्यांच्या नावे १७ कोटींचा भामट्याने घातला गंडा  

ठळक मुद्दे किशोर राजेंद्र पाटील असे या संशयित भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

नाशिक -  एका भामट्याने बॉश, महिंद्र अँड महिंद्रा, एचएएलसारख्या मोठ्या १० कंपन्या आणि निमसरकारी विभागातील एकूण १ हजार ८८८ कर्मचारी यांचे २०१६ ते २०१९ पर्यंत स्वतंत्र आयकर विवरण तयार करून आयकर कायद्याच्या विविध कलमान्वये कट कारस्थान रचून बनावट कपात दाखवून ऑनलाईन nos बंगळुरू येथे दाखल करून दाव्यात कर्मचाऱ्यांच्या नावे तब्बल १६ कोटी ७७ लाख ७४ हजार २३ रुपयांची रक्कम व्याजसह घेऊन अपहार करत शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किशोर राजेंद्र पाटील असे या संशयित भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.


Web Title: Fraudulent duped 17 crore rupees in the name of employees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.