शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचे नाटक करुन लुबाडले, नैराश्येतून तरुणाने जीवनच संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 13:12 IST

तरुणाबरोबर प्रेमाचे नाटक करत तरुणीने त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन त्याला लुबाडले.

ठळक मुद्देचौघांवर गुन्हा दाखल

पुणे : प्रेमाचे नाटक करुन तरुणी व तिच्या आईने या तरुणाला चांगलेच लुबाडले. त्यांना देण्यासाठी त्या तरुणाने दुसर्‍यांकडून उसने पैसे घेतले. पैसे घेतल्यानंतर त्या दोघींनी त्याचा विश्वासघात केला. दुसरीकडे ज्याने उसने पैसे दिले होते, तो आता ते पैसे परत मागू लागला. या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकाश पोपट पवार (वय ३०, रा. बिदरवाडी, ता. खेड, जि़. पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आईच्या फिर्यादीवरुन चाकण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पूजा दशरथ पवार , तारा दशरथ पवार (दोघी रा़ चाकण), सनी वडाने (रा. खेड) आणि गणेश बळीराम शिंदे (रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावेआहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश पवार याच्याबरोबर पूजा पवार हिने प्रेमाचे नाटक केले. त्याला फसवून त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन त्याला लुबाडले. तारा पवार आणि सनी वडाने यांनी तिला मदत केली. तिला पैसे देण्यासाठी प्रकाश पवार याने गणेश शिंदे याच्याकडून उसने पैसे घेतले होते. वारंवार पैसे घेतल्यानंतर तिने प्रकाशचा विश्वासघात केला. त्याचवेळी उसने घेतलेले पैसे परत करण्याची गणेश शिंदे वारंवार मागणी करु लागला. त्यामुळे मानसिक त्रास होऊन प्रकाश पवार याने खेड तालुक्यातील रोहकल येथील रामू गोरे यांच्या आंब्याच्या वनात जाऊन १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकाश पवार याला आत्महत्येस प्रवृत्तकेल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूfraudधोकेबाजी