चार वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन अत्याचार, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 00:34 IST2022-03-22T00:31:31+5:302022-03-22T00:34:23+5:30

अज्ञात आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत...

Four-year-old girl abducted and Physicle abuse in satara | चार वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन अत्याचार, गुन्हा दाखल

चार वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन अत्याचार, गुन्हा दाखल

सातारा - सातारा शहरातून एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून नेऊन अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने, सातारा शहरातून एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आपल्या दुचाकीवरून नेले. यानंतर तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडून तो पसार झाला. संबधित मुलगी जखमी झाली आहे.

याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: Four-year-old girl abducted and Physicle abuse in satara