पैशाच्या वादातून चौघांनी धारदार शस्त्राने चिरला तरुणीचा गळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 17:20 IST2020-12-29T17:19:44+5:302020-12-29T17:20:34+5:30

Crime News : पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट दिली.

The four people cut the young man's throat with a sharp weapon in a money dispute | पैशाच्या वादातून चौघांनी धारदार शस्त्राने चिरला तरुणीचा गळा 

पैशाच्या वादातून चौघांनी धारदार शस्त्राने चिरला तरुणीचा गळा 

ठळक मुद्देमृत आकिब सत्तार आणि आरोपी पक्या उर्फ प्रकाश कोसरे (वय २२) यांच्यात पैशाचा वाद सुरू होता.

नागपूर - पैशाच्या वादातून चाैघांनी एका तरुणीची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली. आकिब अब्दुल सत्तार (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून तो ऑटो चालवित होता. मंगळवारी दुपारी १२ च्च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे श्रावणनगर वस्तीत प्रचंड थरार निर्माण झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत आकिब सत्तार आणि आरोपी पक्या उर्फ प्रकाश कोसरे (वय २२) यांच्यात पैशाचा वाद सुरू होता. मंगळवारी दुपारी आकिब पैसे मागण्यासाठी पक्याच्या घराकडे गेला. तिकडे त्यांच्यात वाद झाल्याने पक्या आणि त्याच्या ३ मित्रांनी आकिबवर सत्तूरचे घाव घालून त्याचा गळा कापून त्याची भीषण हत्या केली. या घटनेची माहिती कळताच वाठोड्याचे ठाणेदार अनिल ताकसांडे आपल्या ताफ्यासह श्रावणनगर वस्तीकडे धावले. पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट दिली.


वृत्त लिहस्तोवर वाठोडा पोलिसांनी आरोपी पक्या तसेच साथीदारांना ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The four people cut the young man's throat with a sharp weapon in a money dispute