अभिनेत्री नोरा फतेहीची चार तास कसून चौकशी; महाठक चंद्रशेखरशी संबंधित खंडणी प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 11:19 IST2022-09-04T11:15:10+5:302022-09-04T11:19:13+5:30

फतेहीला गेल्या आठवड्यात समन्स बजावले होते. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या मंदिर मार्ग कार्यालयात तिची चौकशी करण्यात येऊन जबाब नोंदवून घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सुमारे चार तास ही चौकशी सुरू होती.

Four hours of thorough interrogation of actress Nora Fatehi; Extortion case related to Mahathaka Chandrasekhar | अभिनेत्री नोरा फतेहीची चार तास कसून चौकशी; महाठक चंद्रशेखरशी संबंधित खंडणी प्रकरण 

अभिनेत्री नोरा फतेहीची चार तास कसून चौकशी; महाठक चंद्रशेखरशी संबंधित खंडणी प्रकरण 

नवी दिल्ली : महाठक सुकेश चंद्रशेखरशी संबंधित खंडणी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
 
फतेहीला गेल्या आठवड्यात समन्स बजावले होते. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या मंदिर मार्ग कार्यालयात तिची चौकशी करण्यात येऊन जबाब नोंदवून घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सुमारे चार तास ही चौकशी सुरू होती. फतेहीला चंद्रशेखरकडून बीएमडब्ल्यू कारसह अन्य महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. आपल्याला चंद्रशेखरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती, असे फतेही हिने पोलिसांना सांगितल्याचे समजते. या प्रकरणात फतेहीची चौकशी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिची चौकशी केली होती. 

कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने १७ ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल केले असून, यात आरोपी म्हणून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिचे नाव आहे. 
 

Web Title: Four hours of thorough interrogation of actress Nora Fatehi; Extortion case related to Mahathaka Chandrasekhar