Four convicted for murdering former city president of mira bhayander Praful Patil | Breaking : मीरा-भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील हत्येप्रकरणी चारजण दोषी
Breaking : मीरा-भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील हत्येप्रकरणी चारजण दोषी

मीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांच्या 2010 साली झालेल्या हत्येप्रकरणातील विशाल म्हात्रे, राजेश जिलेदार सिंग, अजय पांडे, गुलाम रसूल शेख या चौघाही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. 

न्यायाधीश जयस्वाल यांनी आज आरोपींना दोषी ठरवताना उद्या शिक्षा सुनवणार असल्याचे म्हटले आहे. या खटल्याचे सरकारी वकील राजा ठाकरे तर तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते हे आहेत. पाटील यांच्यावर २ गोळ्या झाडून 28 वार केले होते. विशाल म्हात्रे याने जागेच्या वादातून राजेश सिंगला सुपारी दिली होती. राजेश सिंग हा भाईंदरचे भाजपा नगरसेवक श्रीप्रकाश उर्फ मुन्ना  सिंग यांचा सख्खा भाऊ आहे. आरोपी विशाल म्हात्रे हा त्यावेळी महापौर असलेले काँग्रेसच्या तुळशीदास म्हात्रे यांचा पुतण्या आहे.

 


Web Title: Four convicted for murdering former city president of mira bhayander Praful Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.