शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

पूर्वीच्या भांडणावरून तरुणाचा खून करणारे चौघे १२ तासांत जेरबंद; थेरगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 4:40 PM

थेरगाव येथील जगतापनगरमध्ये आरोपी यांनी धारदार कोयत्याने ऋषभ याच्यावर जबर वार करून व दगडाने मारून जीवे ठार मारले.

ठळक मुद्दे पोलिसांनी आरोपींना केली अटक

पिंपरी : पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने वार करून तरुणाचा खून केला. थेरगाव येथे शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याप्रकरणी चार आरोपींना १२ तासांत जेरबंद करण्यात आले आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.गुड्ड्या उर्फ किशोर ज्ञानदेव शेलार (रा. लिंक रोड, चिंचवड), सिजीन फिलिप जार्ज (वय २६, रा. काळेवाडी), रोहीत ललन सिंग (वय २२, रा. पवनानगर कॉलनी क्र. २, काळेवाडी), सचिन सोनू साठे (वय २६, रा. गणराज कॉलनी, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ऋषभ गायकवाड (वय १८), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रमोद किसन गायकवाड (रा. जगतापनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ ऋषभ गायकवाड आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. त्या कारणावरून बदला घेण्याच्या उद्देशाने शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थेरगाव येथील जगतापनगरमध्ये आरोपी यांनी धारदार कोयत्याने ऋषभ याच्यावर जबर वार करून व दगडाने मारून जीवे ठार मारले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी वाकड पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा माग काढून १२ तासांत आरोपींना अटक करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक हरिश माने, महेश स्वामी, अविनाश पवार, तानाजी भोगम, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, प्रणिल चौगुले, शंभु रणवरे, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, विक्रम जगदाळे, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, सुहास पाटोळे, प्रमोद भांडवलकर, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, नितीन गेंगजे, सुरज सुतार, शाम बाबा, नितीन ढोरजे, दिपक भोसले, प्रमोद कदम, सचिन नरुटे, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, अभिमन्यु बसनोडे, अन्वर मोमीन, अमोल दातार, सचिन जाधव, देवा वाघमारे, मोहिनी थोपटे, नुतन कोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :ThergaonथेरगावCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसArrestअटक