माजी मंत्री अनिल देशमुख तुरुंगात पडले; उपचारासाठी जे.जे हॉस्पिटलला दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:42 IST2022-04-04T17:32:35+5:302022-04-04T17:42:44+5:30
Former minister Anil Deshmukh fall down :सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

माजी मंत्री अनिल देशमुख तुरुंगात पडले; उपचारासाठी जे.जे हॉस्पिटलला दाखल
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. शुक्रवारी ही घटना घडली होती. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली गेल्या सहा महिन्यांपासून अनिल देशमुख आर्थर रोड तुरुंगात आहेत. आर्थर रोड जेलमध्ये चालत असताना ते पडले आणि त्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
अनिल देशमुख यांना उपचारांसाठी शुक्रवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख जेलमधील बाथरूममध्ये घसरून पडले. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल आहेत. आज त्यांचा MRI काढण्यात आला आहे. चालत असताना पडले आणि त्यामुळे त्यांचा खांदा सरकला आहे. त्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शुक्रवारी त्यांना जे. जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अद्याप या प्रकरणातील सविस्तर माहिती प्राप्त झाली नाही आहे.