शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौर ललित कोल्हेंची कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 20:44 IST

सोमवारी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये कोल्हे तपासात उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देचार दिवसाच्या कोठडीत तपास शून्य : फक्त एक कार जप्त ललित कोल्हे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ मे रोजी रात्री १० वाजता अटक केली होती.

जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या माजी महापौर ललित विजय कोल्हे यांची सोमवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. दरम्यान, अटक केल्यापासून तपासासाठी न्यायालयाने कोल्हे यांची चार दिवस पोलीस कोठडी दिली होती. या काळात पोलिसांनी एक कार जप्त करण्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच कामगिरी केली नाही. सोमवारी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये कोल्हे तपासात उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे म्हटले आहे.

माजी महापौर ललित कोल्हे यांना अटक

 

आरपीआय नेत्याच्या फार्महाऊसवर हल्ला, गार्डवर केला गोळीबार

 

खळबळजनक! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले लाखो रुपये, आमदार निवासजवळील घटना 

 

ललित कोल्हे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ मे रोजी रात्री १० वाजता अटक केली होती. शहर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी ललित कोल्हे यांचा रिमांड रिपोर्ट न्यायालयात सादर केला. त्यात गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर, खंडणी म्हणून घेतलेले ३ लाख ४४ हजार ७५७ रुपये तसेच साहित्या यांच्या मालकीच्या दोन महागड्या कार हस्तगत करण्यासाठी न्यायालयाने कोल्हे यांना १४ दिवस पोलीस मिळावी म्हणून न्यायालयाकडे विनंती केली.त्यावर न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. या चार दिवसात पोलिसांनी जी कारणे पोलीस कोठडीसाठी सांगितली होती, त्यापैकी फक्त एक कार जप्त केली. दुसरी कार व खंडणी स्वरुपात घेतलेली ३ लाख ४४ हजार ७५७ रुपयांची रोकड जप्त केलीच नाही. या चार दिवसात पोलिसांचा तपास शून्यच राहिला. सोमवारी परत न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर करताना तेच जुने कारणे सांगून पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली, मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी अमान्य करुन कोल्हे यांची कारागृहात रवानगी केली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :MayorमहापौरjailतुरुंगPoliceपोलिस