शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 16:17 IST

PMC Bank Scam : वाधवा पिता-पुत्रासह वरियम सिंगची रवानगी न्यायालयीन कोठडीत

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेच्या संचालकाकडे मोर्चा वळविला आहे.चौकशीदरम्यान त्याचा यात सहभाग समोर येताच त्याला अटक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

मुंबईपीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. तर, याप्रकरणी अटकेत असलेल्या एचडीआयएलचे राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्रासह माजी अध्यक्ष वरियम सिंग कर्तार सिंग यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तरतिघांकडील चौकशी पूर्ण झाल्याने वाधवा पिता-पुत्रासह वरियम सिंगच्या न्यायालयीन कोठडीची मागणी बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. निलंबित केलेला बँकेचा व्यवस्थापक जॉय थॉमसची कोठडी संपत असल्याने त्याला गुरुवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

या चौकडीच्या चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेच्या संचालकाकडे मोर्चा वळविला आहे. बुधवारी दुपारी संचालक मंडळातील माजी संचालक सुरजीत सिंगला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो बँकेच्या कर्ज समितीचा सदस्य आहे. चौकशीदरम्यान त्याचा यात सहभाग समोर येताच त्याला अटक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. अन्य संचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

अन्य संचालकांना लूक आऊट नोटीस जारी

पीएमसी बँकेच्या संशयाच्या भोवऱ्यातील अन्य संचालकांना देश सोडणे शक्य होऊ नये, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी त्यांना लूक आऊट नोटीस जारी केली.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकArrestअटकEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखाPoliceपोलिसMumbaiमुंबई