शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

पाकिस्तानच्या Whats App ग्रुपवर लष्करी हद्दीचे छायाचित्रे टाकणारा परप्रांतीय ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 8:08 PM

Crime News : नाशिक रोड, देवळाली कॅम्प गांधीनगर हा भाग लष्कराच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. या भागात भारतीय तोफखाना केंद्र, आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल, स्कुल ऑफ आर्टिलरी देवळाली अशा प्रकारची महत्वाची लष्करी केंद्रे आहेत.

ठळक मुद्देकर्तव्यावर असलेल्या जवानांनी संशयित संजीव कुमार (वय २१, रा.मूळ आलापूर, जि.गोपालगंज, बिहार ) यास शनिवारी (दि.3) संध्याकाळी देवळाली कॅम्प पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : शहरातील देवळाली लष्करी सैनिक रुग्णालयाच्या आवारात संध्याकाळच्या सुमारास फिरून मोबाईलद्वारे छायाचित्रे काढणाऱ्या परप्रांतीय युवकास सैन्याच्या जवानांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्याने काढलेली छायाचित्रे पाकिस्तानमधून हाताळल्या जाणाऱ्या एका व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये पाठविल्याचे तपासात पुढे आले आहे. कर्तव्यावर असलेल्या जवानांनी संशयित संजीव कुमार (वय २१, रा.मूळ आलापूर, जि.गोपालगंज, बिहार ) यास शनिवारी (दि.3) संध्याकाळी देवळाली कॅम्प पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक रोड, देवळाली कॅम्प गांधीनगर हा भाग लष्कराच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. या भागात भारतीय तोफखाना केंद्र, आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल, स्कुल ऑफ आर्टिलरी देवळाली अशा प्रकारची महत्वाची लष्करी केंद्रे आहेत. त्यामुळे या भागात सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेशबंदी असून या भागात कुठल्याहीप्रकारे विनापरवाना फोटो, व्हिडीओ काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसे सुचनाफलकसुध्दा या भागात लष्कराकडून लावण्यात आले आहेत. दरम्यान, लष्करी हद्दीत सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी राहणारा हा संशयित मजुर संजीव कुमार दीड ते दोन किलोमीटर लांब अंतर येऊन संध्याकाळी मोबाईलने सैनिकी रुग्णालयाच्या भागात फोटो काढताना जवानांना शुक्रवारी आढळून आला. त्यास तात्काळ ताब्यात घेत जवानांनी त्याचा मोबाईल जप्त केला आणि कसून चौकशी सुरु केली.

Hathras Gangrape : 'निर्भया'च्या वकील सीमा कुशवाह यांनाही पोलिसांनी रोखलं, पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यास मज्जाव

संबंधित फोटो पाकिस्तान येथील व्हाट्सअप ग्रुप वर पाठविले असल्याचे तपासानंतर निदर्शनास आले. त्यानंतर संबधीत लष्करी त्यांनी येथील जबाबदार वरिष्ठ लष्करी अधिकारी यांच्या हा प्रकार  निदर्शनास आणून दिला. सध्या देवळाली कॅम्प येथील रेल्वे स्टेशन जवळील चिंतामणी बस स्टॉप कॅम्प रोड परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवरील पत्र्याच्या शेडमध्ये हा संशयित संजीव वास्तव्यास आहे. याप्रकरणी संजीव यास ताब्यात घेत शनिवारी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी स्कुल ऑफ आर्टिलरी च्या मिडीयम बॅटरी येथील लष्करी अधिकारी ओमकार नाथ यादव(42) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कार्यालयीन गोपनीयता अधिनियम1923च्या कलम 3 व 4प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :ArrestअटकPakistanपाकिस्तानNashikनाशिकPoliceपोलिसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप