खळबळजनक! केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाचजण आढळले मृतावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:57 IST2022-07-02T15:57:10+5:302022-07-02T15:57:52+5:30

Family attempt Suicide : पोलिसांनी सांगितले की, घराचा मालक एका खोलीत गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळला तर इतर चार सदस्य जमिनीवर पडलेले आढळले.

Five members of the same family were found dead in Kerala | खळबळजनक! केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाचजण आढळले मृतावस्थेत

खळबळजनक! केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाचजण आढळले मृतावस्थेत

तिरुअनंतपुरम : केरळमधील कल्लंबलमजवळ शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, घराचा मालक एका खोलीत गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळला तर इतर चार सदस्य जमिनीवर पडलेले आढळले. त्यांनी विष प्राशन केल्याचा संशय आहे.

मृतांमध्ये घरमालक, त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्याशिवाय आणखी एका महिला नातेवाईकाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “प्राथमिक तपासात हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. अशी माहिती मिळत आहे की, हे कुटुंब काही आर्थिक समस्यांमुळे चिंतेत होते, परंतु आम्ही सविस्तर तपासणीनंतरच अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो." पोलिसांनी पुढे सांगितले की, या घटनेची बातमी जेव्हा सकाळी कुटुंबातील जवळचे नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले.

Web Title: Five members of the same family were found dead in Kerala