शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

गस्तीवरील पोलिसांवर मोटारसायकलस्वारांनी झाडल्या ठासणीच्या बंदुकीतून दोन फैरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 4:24 PM

Firing : पाल रस्त्यावरील पहाटेची घटना ; थांबविले  होते चौकशीसाठी 

ठळक मुद्देदोन्ही मोटारसायकलवरील दोघंही बंदुकधारी युवकांनी रस्त्याच्या कडेला उभे असलेले पोलीसांचे वाहन व पोलीसांना रस्त्यात उभे असल्याचे पाहून पोलीसांना जीवे  मारण्याच्या उद्देशाने त्या  युवकांनी ठासणीच्या बंदकीतून पोलीसांच्या दिशेने दोन फैरी झाडल्याने एकच खळबळ उडाल

रावेर  (जि. जळगाव) : रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी रस्त्याने पालकडून येत असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील  दोन जणांनी  ठासणीच्या बंदुकीतून गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडून पोबारा केला.  पाल - रावेर रस्त्यावर सहस्त्रलिंग गावालगतच्या सलीमच्या ढाब्याजवळ मंगळवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

याबाबत रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, सातपुड्याच्या  अतिदुर्गम डोंगरदऱ्यातून जाणार्‍या रावेर - पाल रस्त्यावर रावेर पोलीस  स्टेशनच्या कॅमेरा वाहनातून पोकॉ श्रीराम कंगणे, गृहरक्षक तालूका  समादेशक कांतीलाल तायडे, सुनील तडवी, अमित समर्थ हे गस्त घालत शेरीनाका मध्यप्रदेश सीमेवरील आंतरराज्यीय  नाकाबंदीला भेट देत रावेरकडे परतीच्या मार्गाने प्रयाण केले.      दरम्यान, सहस्त्रलिंग गावालगतच्या वळणरस्त्यावरील सलीमचा  ढाबा येथे चहापाणी मिळते काय? यासाठी वाहनाच्या  खाली उतरून पोकॉ कांगणे व त्यांचे सहकारी चौकशी करीत असतानाच पालकडून दोन मोटारसायकलवर चार जण येत असल्याचे त्यांना दिसले. तथापि, रात्रीच्या संचारबंदीत संशयास्पद स्थितीत कोण फिरत आहेत? यासंबंधी चौकशी करण्यासाठी त्यांनी मोटारसायकलस्वारांना हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोन्ही मोटारसायकलवरील दोघंही बंदुकधारी युवकांनी रस्त्याच्या कडेला उभे असलेले पोलीसांचे वाहन व पोलीसांना रस्त्यात उभे असल्याचे पाहून पोलीसांना जीवे  मारण्याच्या उद्देशाने त्या युवकांनी ठासणीच्या बंदकीतून पोलीसांच्या दिशेने दोन फैरी झाडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सुदैवाने कोणासही हानी नाही

संशयित आरोपींनी केलेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. हे विशेष. सदरची घटना  १० मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींनी युटर्न  घेवून पालकडे तर दुसर्‍या मोटारसायकलवरील आरोपींनी सहस्त्रलिंगकडे पोबारा केल्याने पाठलाग करणार्‍या पोलीसांच्या हाती अपयश आले. अंदाजे विशी ते पंचविशतील हे तरूण असण्याचा पोलीसांनी अंदाज वर्तवला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटया घटनेबाबत पाल औटपोस्ट चौकीतून संदेश प्राप्त होताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर  पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, प्रभारी पोलीस निरीक्षक बशीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी घटनास्थळी  भेट दिली. यानंतर तपासचक्र गतीमान केले आहे. शिकारीसाठी ‘ते’ जात असावे

संशयीत आरोपी ठासणीच्या बंदुका घेऊन शिकारीसाठी जात  असताना त्यांना पोलीस वाहन व रस्त्यावर खाकी वस्त्र परिधान  केलेले चार जवान उभे दिसल्याने कदाचित वन्यजीव वा वनविभागाचे  कर्मचारी असल्याचे संशयातून त्यांनी थेट जीवे ठार मारण्याचे उद्देशाने  दोन बंदकीतून दोन फैरी झाडल्याचा अंदाज असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम कांगणे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात भादंवि कलम ३०७, ३५३, ३३७, आर्म अॅक्ट ३(२५) व ३४ अन्वये बंदुकीच्या दोन फैरी झाडून पोलिसांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे पुढील तपास करीत आहेत.

बंदूक धावपळीत सोडून गेले गस्तीवरील पोलिसांवर ठासणीच्या बंदुकीतून फैरी झाडणारे आरोपी  पसार झाले असले तरी पसार होण्याच्या धावपळीत त्यांच्या  हातातील ठासणीची बंदूक मात्र ते सोडून गेल्याने पोलीसांना  तपासाचा धागादोरा त्यातून गवसतो का? हा पुढे कळेलच.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसJalgaonजळगावtwo wheelerटू व्हीलर