Join us  

"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 9:37 AM

Chief Minister Eknath Shinde : महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आहे. तीच संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनामिमित्त आज मुंबईतील हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी, हे सर्वसामान्यांच सरकार आहे, आरोपांकडे लक्ष देत नाही. विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन महाराष्ट्राने विकासाची वाट धरली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने महाराष्ट्राने 65 वर्षाचा टप्पा पूर्ण केला. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आहे. तीच संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात 10 वर्षात प्रगती झाली. महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे. आम्ही आरोपांना उत्तर न देता, कामाने उत्तर देतोय. जनता सूज्ञ आहे. जनता काम करणाऱ्यांच्या मागे उभी राहते. शिव्या शाप देणारे, घरी बसलेल्यांना साथ देत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, महाराष्ट्र एक संस्कृत राज्य आहे. पुरोगामी महाराष्ट्राला एक परंपरा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

याचबरोबर, निवडणुका येतात-जातात. पण राज्यकर्ते कोण-काय करतं, हे मागे राहतं. दुर्देवाने राजकारणाची पातळी खालावली आहे. रोज शिव्या, शाप आरोप या पलीकडे विरोधकांकडून काही ऐकायला-पाहायला मिळत नाही. विरोधकांकडे मुद्देच नसल्याने अशाप्रकारची भाषा बोलली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रगती केली. त्यामुळे आम्हीही विरोधकांना आमच्या कामातून उत्तर देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कामगारांच्या कष्टानं मुंबई उभी राहिली घरी बसलेल्यांमुळे महाराष्ट्र मागं राहिला आहे. सोशल माध्यमावरुन राज्य चालवता येत नाही. ही मुंबई कामगारांच्या कष्टानं उबी राहिली आहे. त्यांच्या कष्टामुळेच आज महाराष्ट्र देशाच्या विकासात योगदान देत आहे. त्यामुळेच आमच्या सरकारने मुंबईतील गिरणी कामगारांना घरे दिली आहेत. जिथं स्कोप असेल, तिथं घरं देणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील सहा जागा जिंकणारलोकसभा निवडणुकीच्या काही जागा वाटपांचा महायुतीचा तिढा अद्यापही सुटला नाही, याबाबत विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे आणि नाशिकचा तिढा लवकरच सुटेल. मुंबईतील सहा जागा महायुती जिंकेल. तसेच, आमच्या सरकारने मुंबईला पाठबळ दिले. बंद पडलेल्या प्रकल्पांना चालना दिली. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जास्तीत जास्त सुरू केला, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई