शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

पोलिसांमुळे वाचला जीव, ओमी कलानी टीमच्या पदाधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 3:49 PM

Firing : पोलिसांनी हल्लेखोरांची गाडी ताब्यात घेतली असून तपासासाठी तीन पथके तैनात केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

ठळक मुद्देओमी कलानी टीमच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील श्रद्धा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

उल्हासनगर - ओमी कलानी टीमचा पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक असलेले संदीप गायकवाड मित्रांसह बुधवारी रात्री ११ वाजता श्रीराम चौकातून जात होते. त्यावेळी कारमध्ये दबा देऊन बसलेल्या दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांची पेट्रोलींग करणारी गाडी आल्याने संदीपचा जीव वाचला असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.उल्हासनगरातील ओमी कलानी टीमचे पदाधिकारी असलेले संदीप गायकवाड हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. बुधवारी रात्री ११ वाजता मित्र जहागीर मोरे यांच्या सोबत श्रीराम चौकातून घरी जात होते. त्यावेळी कार मध्ये दबा देऊन बसलेल्या दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने अचानक हल्ला केला. तसेच गोळीबार केला. हल्ल्याच्या दरम्यान पेट्रोलींग करणारी पोलीस गाडी आल्याने, संदीप याने पोलिसांच्या गाडीचा आश्रय घेतला. त्या दरम्यान हल्लेखोरांनी कारसह पळ काढला. पोलिसांनी कारचा पाठलाग केला. मात्र हल्लेखोरांनी कार उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात टाकून धूम ठोकली. पोलिसांनी हल्लेखोरांची गाडी ताब्यात घेतली असून तपासासाठी तीन पथके तैनात केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.ओमी कलानी टीमच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील श्रद्धा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमावर गुन्हा दाखल केला. हल्लेखोर लवकरच जेरबंद होण्याची माहिती विठ्ठल वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली. संदिप हा कल्याण मटका जुगार धंदा चालवीत असल्याची चर्चा शहरात होत आहे. पोलीस तपासात सत्य बाहेर येण्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर