बदलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राम लिये यांच्या कारवर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 23:20 IST2020-03-20T23:18:14+5:302020-03-20T23:20:02+5:30

राम लिये यांच्या वाहनावर कर्जतजवळील डिकसळ गावाजवळ गोळीबार झाला.

Firing on NCP Leader Ram Liye's Car BKP | बदलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राम लिये यांच्या कारवर गोळीबार

बदलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राम लिये यांच्या कारवर गोळीबार

कर्जत/ठाणे - बदलापूरमधीलराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राम लिये यांच्या कारवर आज अज्ञातांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. राम लिये यांच्या कारवर कर्जतजवळील डिकसळ गावाजवळ गोळीबार झाला. दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञान हल्लेखोरांनी राम लिये यांच्या कारवर तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्ल्यात कुणालाही दुखापत झाली नाही. 
बदलापूरमधीलराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राम लिये यांच्या मुलीचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्त ते आपल्या कुटुंबीयांसह एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते. तेथून परतत असताना कर्जतजवळील डिकसळ गावाजवळ दोन दुचाकींवरून अज्ञात हल्लेखोर त्यांच्या कारजवळ आले. त्यांनी लिये यांच्या कारच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत लिये आणि कारमधील इतर कुणालाही काहीही दुखापत झाली नाही. 

Web Title: Firing on NCP Leader Ram Liye's Car BKP