शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या चौगुले प्लॉट भागात गोळीबार; एकजण जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 17:49 IST

Firing Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौगुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात रविवारी पावणे पाच वाजता वाद झाला.

ठळक मुद्देत्यात दोन्ही गटाकडून पंधरा ते वीस जण एकमेकांवर चालून आले. दगड, विटांचा मारा झाला. त्यात एका चारचाकीचे नुकसान झाले आहे.या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौगुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात रविवारी पावणे पाच वाजता वाद झाला.

जळगाव : चौगुले प्रभागात रविवारी सायंकाळी पावणे पाच वाजता दोन गटात तुफान वाद उफाळून आला. त्यात एका गटाकडून गोळीबार झाला. विक्रम सारवान याच्या कानाला चाटून गोळी गेली, त्यात तो बालंबाल बचावला असून जखमी झाला आहे. दरम्यान,यावेळी दोन्ही गटाकडून विटा व दगडांचा मारा झाला. या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौगुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात रविवारी पावणे पाच वाजता वाद झाला.

त्यात दोन्ही गटाकडून पंधरा ते वीस जण एकमेकांवर चालून आले. दगड, विटांचा मारा झाला. त्यात एका चारचाकीचे नुकसान झाले आहे.शिंदे गटाकडून झालेल्या गोळीबारात विक्रम सारवान हा जखमी झाला आहे. त्याच्या कानाला दुखापत झाली असून तो बचावला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शनिपेठचे निरीक्षक विठ्ठल ससे, शहरचे निरीक्षक धनंजय येरुळे नियंत्रण कक्षातील अधिकारी व आरसीपी प्लाटून घटनास्थळावर दाखल झालेला आहे. दगडफेक करणारे पसार झालेले असून पोलिसांकडून झाडाझडती सुरू आहे. जखमी विक्रम सारवान याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आपल्याकडून गोळीबार झाला नसल्याचा दावा शिंदे गटाने केलेला आहे, परंतु पोलिसांकडून वस्तुस्थिती तपासली जात आहे.अद्यापपर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. हा वाद होण्याआधी मोबाईलवरच एकमेकांमध्ये वाद झाले होते. दोन्ही गटांतील तरुण पूर्वी सोबतच असायचे, मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात वाद आहेत. रविवारी ते गोळीबार व दगडफेकीने उफाळून आले.

टॅग्स :FiringगोळीबारJalgaonजळगावPoliceपोलिस