शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्काराची तक्रार; दुसऱ्या दिवशी पीडितेच्या वडिलांचा झाला अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 20:59 IST

FIR of gang rape registered then occurs accidental Death : कानपूरचे उपमहानिरीक्षक प्रीतिंदर सिंह म्हणाले की, अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देमुख्य आरोपी गोलू यादव याला अटक करण्यात आली आहे, तर दीपू यादव आणि सौरभ हे दोघे फरार आहेत.

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात एका १३ वर्षाच्या मुलीवर ‘सामूहिक बलात्कार’ची खळबळजनक घटना घडली. या पीडित मुलीच्या वडिलांचा बुधवारी संशयात्मक मृत्यू झाला, त्यांनी बलात्काराच्या प्रकरणातील एका आरोपीचे नाव घेऊन पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी ही अपघाती मृत्यूची घटना घडली.पोलिसांनी सांगितले की, सामुदायिक आरोग्य केंद्राच्या बाहेरच एका ट्रकने पीडितेच्या वडिलांना धडक दिली, जिथे त्यांच्या मुलीवर उपचार सुरु होते. जिल्ह्यातील घाटमपूर भागात ही घटना घडली. कानपूरचे उपमहानिरीक्षक प्रीतिंदर सिंह म्हणाले की, अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पीडितेच्या कुटुंबातील लोकांनी आणि ग्रामस्थांनी हा खून असल्याचा आरोप केला.“माझ्या नातीवर बलात्कार झाला, माझ्या मुलाची हत्या झाली आहे. पोलिस गुंतागुंत आहेत, ”असे मुलीच्या आजोबांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. हे कुटुंब साजेती पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावात राहते. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी सामूहिक बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल केला होता. कानपूरचे अतिरिक्त एसपी (ग्रामीण) ब्रिजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, मुख्य आरोपी गोलू यादव याला अटक करण्यात आली आहे, तर दीपू यादव आणि सौरभ हे दोघे फरार आहेत.तक्रार नोंदवल्यानंतर वडिलांना “धमक्या” दिल्या जात असल्याचे कुटुंबातील एका सदस्याने सांगितले. “आमची (मंगळवार) तक्रार दाखल होताच मुख्य आरोपीच्या कुटूंबाने आम्हाला धमकवयला सुरुवात केली. “सावध रहा, माझे वडील उपनिरीक्षक आहेत’,अशी धमकी त्यांनी आम्हाला दिली. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळAccidentअपघातDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक