शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! कुत्र्याला मरेपर्यंत मारणाऱ्या वॉचमनविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 18:56 IST

वॉचमनविरोधात जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे पायानं अधू झालेल्या आणि खंगलेल्या भटक्या कुत्र्याला एका सोसायटीतील वॉचमननं निर्घृण मारल्याची घटनाविलेपार्ले येथे ही शिवम सोसायटी येथे घडली आहे. या वॉचमनचं नाव एन. ठाकूर असं आहे. 

मुंबई - अपंग आणि खंगलेल्या भटक्या कुत्र्याला मरेपर्यंत मारणाऱ्या सोसायटीच्या वॉचमनविरोधात जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायानं अधू झालेल्या आणि खंगलेल्या भटक्या कुत्र्याला एका सोसायटीतील वॉचमननं निर्घृण मारल्याची घटना विलेपार्ले येथे ही शिवम सोसायटी येथे घडली आहे. सोसायटीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीच्या वॉचमनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या वॉचमनचं नाव एन. ठाकूर असं आहे. विलेपार्ले पश्चिमेकडील शिवम सोसायटीच्या परिसरात खंगलेल्या आणि एका पायाने अपंग असलेला एक कुत्रा जळजवळ वर्षभरापासून भटकताना दिसत होता. या सोसायटीचा वॉचमन एन. ठाकूर यानं या भटक्या कुत्र्याला मरेपर्यंत क्रूरपणे मारहाण केली. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मितुल प्रदीप यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी वॉचमनविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सोसायटीचा वॉचमन असलेल्या एन. ठाकूरविरोधात मितुल प्रदीपने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या भटक्या कुत्र्याला ठाकूरने क्रूरपणे मारहाण केली होती. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी संगीतकार उदय मुजुमदार यांनीही ही घटना पाहिली होती. मी त्यांच्यासोबतच जुहू पोलीस ठाण्यात जाऊन वॉचमनविरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहिती मितुल प्रदीप हिने दिली. मितुल ही कवी प्रदीप यांची मुलगी आहे. या कुत्र्याला लंगडू नावाने ओळखायचे. काही दिवसांपूर्वीची ही घटना आहे. एका दिवशी रात्री वॉचमन या कुत्र्याला मारत असल्याचे आम्ही पाहिलं. मी इमारतीतून खाली उतरलो आणि त्याच्या तावडीतून कुत्र्याची सुटका केली. नंतर त्याला पशूवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, दुर्दैवानं एका आठवड्यापूर्वी कुत्र्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आम्ही वॉचमनविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली अशी माहिती मुजुमदार यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी ठाकूरविरोधात प्रिवेंशन ऑफ क्रुएल्टी अ‍ॅक्टच्या काही कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

टॅग्स :dogकुत्राPoliceपोलिसMumbaiमुंबई