'नमो भारत'मध्येच लैंगिक संबंध ठेवलेल्या कपल विरोधात FIR, किती होऊ शकते शिक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:40 IST2025-12-24T11:39:02+5:302025-12-24T11:40:36+5:30
धावत्या ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या मुलगा-मुलीसह हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश असून, त्याला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

'नमो भारत'मध्येच लैंगिक संबंध ठेवलेल्या कपल विरोधात FIR, किती होऊ शकते शिक्षा?
दिल्ली-मेरठ दरम्यान धावणाऱ्या 'नमो भारत' ट्रेनमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या विद्यार्थी जोडप्याविरोधात गुन्हा दखल करण्यात आला असून त्यांचा सोध घेतला जात आहे. याप्रकरणी 'एनसीआरटीसी'ने (NCRTC) मुरादनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धावत्या ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या मुलगा-मुलीसह हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश असून, त्याला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
साधारणपणे आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता. यात एक जोडपे वंदेभारत ट्रेनमध्येच अश्लील कृत्य (लैंगिक संबंध) करताना दिसत होते. त्यांच्या पेहरावावरून ते महाविद्यालयीन विद्यार्थी असू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मेंटेनन्स एजन्सीचे अधिकारी दुष्यंत कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. रेल्वेतील सीसीटीव्ही फीडमधून हा व्हिडिओ रेकॉर्ड करून आरोपी रिषभ कुमार या ऑपरेटरने व्हायरल केला होता.
आरोपींवर हे गुन्हे दाखल -
एसीपी लिपी नगायच यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य), कलम ७७ (दृश्यरती/वॉयेरिझम) आणि आयटी ॲक्टच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी होऊ शकते शिक्षा -
तपासातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कलम २९६ अंतर्गत दोषी आढळल्यास जास्तीत जास्त तीन महिन्यांचा कारावास किंवा १००० रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच, कलम ७७ याअंतर्गत किमान एक वर्ष ते कमाल तीन वर्षांपर्यंत कैद आणि दंडाची तरतूद आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने या जोडप्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.