...अखेर 'त्या' वृद्धाचा खून भूमाफियांना भोवला, रम्मी राजपूतसह 19 गुन्हेगारांवर मोक्का, दीपक पांडेय यांचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:44 PM2021-05-06T22:44:05+5:302021-05-06T22:44:43+5:30

Nashik Crime News : गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवलीत 17 फेब्रुवारी रोजी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून भूमाफियांनी भूधारक रमेश वाळु मंडलीक (70) यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते.

... Finally, the murder of 'that' old woman engulfed the land mafia, 19 criminals including Rummy Rajput were attacked by Mocca, Deepak Pandey | ...अखेर 'त्या' वृद्धाचा खून भूमाफियांना भोवला, रम्मी राजपूतसह 19 गुन्हेगारांवर मोक्का, दीपक पांडेय यांचा दणका

...अखेर 'त्या' वृद्धाचा खून भूमाफियांना भोवला, रम्मी राजपूतसह 19 गुन्हेगारांवर मोक्का, दीपक पांडेय यांचा दणका

Next

नाशिक - आनंदवलीतील मोक्याचा भूखंड गिळंकृत करण्यासाठी भूमाफियांनी एका होमगार्डला भूधारक वृद्धाच्या खुनाची सुपारी देत निर्घृणपणे फेब्रुवारी महिन्यात काटा काढला होता. या खुनप्रकरणी पोलीस आयुक्तांनी भूमाफिया टोळीचा म्होरक्या संशयित रम्मी राजपूतसह 19 संशयितांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमअंतर्गत (मकोका) गुरुवारी (दि.6) कारवाई केली आहे.

गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवलीत 17 फेब्रुवारी रोजी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून भूमाफियांनी भूधारक रमेश वाळु मंडलीक (70) यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. दस्तुरखुद्द दिपक पांडेय यांनी या गुन्हयाच्या तपासात लक्ष घालून पोलीस ठाण्यात सलग तीन दिवस तळ ठोकत घटनास्थळी भेट देऊन तपासाला वेळोवेळी दिशा दिली. या खुनाच्या घटनेत भूमाफियांनी कट रचल्याचे समोर आल्याने त्यांनी या टोळीचा पर्दाफाश केला होता.

आनंदवलीतील मंडलीक यांची हत्या वरवर जमीन वादातून झालेली आहे, असे सुरुवातीला भासवण्यात आले होते. हत्या करणारा आरोपी हा सुद्धा भाडोत्री होता. त्यामुळे फारसे प्रत्यक्ष पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते. उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल आणि त्यांच्या पथकाने पुराव्यांची साखळी जोडून या गुन्ह्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या तब्बल डझनभर संशयितांना समोर आणले.. यापैकी दहा संशयितांना बेड्याही ठोकल्या.   शहरात वाढती भुमाफियांची गुन्हेगारी आणि संघटीतपध्दतीने त्यासाठी आखले जाणारे षडयंत्र रचले जात असल्याचे निष्पन्न झाले. भूमाफियांची शहराच्या जमिनीत खोलवर रुजणारी पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी पांडेय यांनी कंबर कसली.

  त्यामुळे या टोळीचा म्होरक्या रम्मी राजपूतच्या टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाई  केली. पांडेय यांनी घटना घडल्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यातच मोक्कानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला होता. गंगापूर पोलिस ठाण्याने प्रस्ताव तयार करत त्यांची 'कुंडली' काढली. टोळीतील संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने अखेर पांडेय यांनी मकोका प्रस्तावास मंजुरी दिली. या वर्षातील ही तिसऱ्या मोठ्या टोळीभोवती मकोका कायद्याचा फास आवळण्यात आला असून अशाप्रकारे ही चौथी कारवाई आहे.
 
या टोळीभोवती मोक्काचा आवळला फास
गुन्हयाचा मास्टर माइंड हा रम्मी राजपुत असल्याचे पोलिसांनी सांगितले गुन्हा घडल्यापासून रो फरार आहे. त्याच्या टोळीतील सचिन श्रंबक मंडलीक, अक्षय जयराम मंडलीक, भुषण भिमराज मोटकरी,  सोमनाथ काशिनाथ मंडलीक, दत्तात्रय काशिनाथ मंडलीक, नितीन पोपट खैर,  आबासाहेब पाराजी भडांगे, भगवान बाळु चांगले,  बाळासाहेब बारकु कोल्हे, गणेश भाउसाहेब काळे,  सागर शिवाजी ठाकरे, वैभव अनिल वराडे, नगदीश अंबक मंडलीक,  रम्मी परमजिसिंग राजपूत, मुक्ता एकनाथ मोटकरी, गोकुळ काशिनाथ आव्हाड, अमोल हरिभाउ कालेकर, सिध्देश्वर रामदास आंडे, दत्तात्रय अरूण सुरवाडे, नारायण गोविंद बेंडकुळे यांचे विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम  कायदयाअन्वये आदेश पारित करून कारवाई करण्यात आली आहे.  गुन्हयाचा पुढील तपास सहायक आयुक्त समीर शेख हे करत आहेत.
 


जेव्हा मंडलिक खुनाचा गुन्हा घडला तेव्हा प्रथमदर्शनी हा गुन्हा भाऊबंदकीच्या वादातून घडला असावा असे वाटत होते किंबहुना तसे भूमाफियांनी भासविण्याचा प्रयत्न केला होता मात्र गुन्हयाच्या तपासात विविध बाबी पुढे आल्या. संशयित गुन्हेगारांच्या चौकशीतूनही काही महत्वाची माहिती हाती आली. त्यानुसार तपासाला गती देण्याचे आदेश दिले. 10 संशयित गुन्हेगार यामध्ये अटक करण्यात आले आहे. फरार रम्मी राजपूत व त्याच्या एका साथीदारालाही लवकरच अटक केली जाईल.  भुमाफियांना दहशत आता खपवून घेतली जाणार नाही. यापुढे जर गुन्ह्यात सहभाग आढळल्यास थेट झोपडपट्टीदादा कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्यात येईल.
- दिपक पांडेय, पोलीस आयुक्त

Web Title: ... Finally, the murder of 'that' old woman engulfed the land mafia, 19 criminals including Rummy Rajput were attacked by Mocca, Deepak Pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app