शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बाबो! शिकता शिकता शिक्षकावरच प्रेम जडलं; विद्यार्थिनीने त्याच्यासाठी घरदार सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 18:51 IST

Crime News : एका विद्यार्थिनीचं शिकता शिकता शिक्षकावरच प्रेम जडलं आणि तिने त्याच्यासाठी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेकजण काहीही करायला तयार होतात. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एका विद्यार्थिनीचं शिकता शिकता शिक्षकावरच प्रेम जडलं आणि तिने त्याच्यासाठी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिकणारी विद्यार्थिनी तिला इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली. बडू गावात ही हैराण करणारी घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनीही आपल्या प्रेमाची कल्पना घरच्यांनी दिली होती. मात्र घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला विरोध केला. प्रेमाला विरोध झाल्यानंतर विद्यार्थिनीने शिक्षकासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. 

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचा इंग्रजीचा शिक्षक यांचं गेल्या दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. या काळात त्यांच्या कुटुंबीयांनादेखील याची माहिती मिळाली होती. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांची समजूत घालत त्यांना एकमेकांपासून वेगळं होण्याचा अनेकदा सल्ला दिला होता. मात्र या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही घटना घडण्यापूर्वी एका रविवारी या शिक्षकाने गावातील झेरॉक्स सेंटरमधून आधार कार्ड आणि इतर काही कागदपत्रांच्या झेरॉक्स काढल्या. त्यानै एका बनावट सिम कार्डसाठीही दुकानदाराला विनंती केली होती. मात्र दुकानदारानं ते द्यायला नकार दिला. अशी सगळी तयारी करून त्यांनी एका जागी भेटण्याचा निर्णय घेतला आणि तिथून गाव सोडून ते पळून गेले. 

कुटुंबीयांना हे दोघं कुठे गेले आहेत याबाबत काहीच माहिती नाही. तसेच घरातील काही सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी आणि शिक्षक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघांच्याही कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. कर्ज घेतलेल्या पैशांमुळे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. 

माणुसकीला काळीमा! कोरोनाचं औषध म्हणून दिलं 'विष', तिघांचा मृत्यू; पैशांसाठी असा रचला भयंकर कट

विषबाधा झालेल्या कुटुंबाने एका व्यक्तीला कर्ज दिले होते. जेव्हा कुटुंबाने पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने हे कृत्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या इरोडमध्ये ही घटना घडली आहे. करुप्पनकाउंडर (72 वर्षे) यांनी काही महिन्यांपूर्वी आर कल्याणसुंदरम नावाच्या व्यक्तीला 15 लाख रुपये दिले होते. करुप्पनकाउंडर यांनी गरज असल्यामुळे कल्याणसुंदरमकडे पैसे परत मागितले. पैशांची परतफेड करू न शकल्यामुळे कल्याणसुंदरम यांनी करुप्पनकाउंडर आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. कल्याणसुंदरम यांनी सबरी नावाच्या व्यक्तीसोबत एक योजना आखली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकStudentविद्यार्थीPoliceपोलिसRajasthanराजस्थान