गायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 17:13 IST2018-08-14T17:11:48+5:302018-08-14T17:13:55+5:30
संबंधित महिलेने स्वत:च दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा अभिजीतने केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

गायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं
मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीतने एका महिलेला फोनवरून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप करणारी महिला ही त्याच्याच इमारतीत राहणारी आहे अशी माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी ''लोकमत''शी सांगितले. भा. दं. वि.कलम ५०९ आणि ५०६ अन्वये अभिजीतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोसायटीत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामावरून अभिजीत आणि तक्रारदार महिलेत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी फोनवर बोलताना अभिजीतने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. अभिजीत भट्टाचार्यची व्यावसायिक जागा भाडेतत्वावर दिली आहे. त्याचे भाडेकरू तिथं ड्रिलिंगचे काम करत होते. या कामाला त्या महिलेने विरोध केला. म्हणून जागेचा मालक असल्यामुळे अभिजीतने या प्रकरणात मध्यस्थी केली अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे संबंधित महिलेने स्वत:च दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा अभिजीतने केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.