India vs Australia 3rd T20I Live Streaming When and Where to Watch in India : मेलबर्नच्या मैदानावर झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवारी होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हलवर तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी सज्ज आहे. टी-२० वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला सामना रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही लढत मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासह ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्याच्या दृष्टिने शेवटची संधी असेल. उर्वरित तिन्ही सामने जिंकून टीम इंडिया अजूनही मालिकेवर आपलं नाव कोरू शकते. याच इराद्याने सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरेल.
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेक शर्माचा 'वन मॅन शो', मोहम्मद रिझवानचा विक्रम मोडला!
चला तर मग एक नजर टाकूया भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी-२० सामन्यावर! कुठं आणि कसा पाहता येईल हा सामना? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'दोघांत तिसरा अन् मॅच विसरा’ असं म्हणत पाऊस पुन्हा बॅटिंग करणार का? यासंदर्भातील सविस्तर माहिती
सामन्यावर पावसाचे सावट आहे का?
स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार, होबार्टमधील वातावरण ढगाळ आणि उष्ण असेल. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे कोणतेही सावट दिसत नाही. ही बातमी क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.
कधी अन् कुठं रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना?
- सामना: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरा टी२० सामना
- सामन्याची तारीख: २ नोव्हेंबर,२०२५ (रविवार)
- सामन्याचे ठिकाण होबार्ट, बेलेरिव्ह ओव्हल
- सामन्याची वेळ: भारतीय प्रमाण वेळेनुसार, हा सामना दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुरु होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरा टी२० सामना कुठे पाहायचा?
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी२० सामना स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित होईल.
- लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचा आनंद घेता येईल.
भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग, जितेश शर्मा.
ऑस्ट्रेलियाचा संघ
मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टिरक्षक) ट्रॅविस हेड, टिम डेविड, मिशेल ओवेन, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, महाली बियर्डमन, झेवियर बार्टलेट,
नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, शॉन अॅबॉट, मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप, तनवीर संघा.