शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पिपळा ग्रामसभेत हाणामारी : राजकीय वैमनस्य उफाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:53 IST

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत दोन गटात जोरदार वाद झाला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने प्रजासत्ताक दिनी या भागात दिवसभर वातावरण गरम होते.

ठळक मुद्देमाजी सरपंचाच्या कार्यालयात तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत दोन गटात जोरदार वाद झाला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने प्रजासत्ताक दिनी या भागात दिवसभर वातावरण गरम होते.प्रजासत्ताक दिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचेही आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ग्रामसभा सुरू झाली. त्यात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी एका मुद्यावरून प्रल्हाद पोटभरेंचा सुधाकर बेलेकर, वासुदेव भोयर आणि अभय भोयरसोबत वाद झाला. तो वाढला अन् या तिघांनी प्रल्हाद पोटभरेंना मारहाण केली. यावेळी तेथे असलेल्या माजी सरपंच तसेच प्रॉपर्टी डीलर वैशाली किशोर वानखेडे यांनी वाद शांत करण्यासाठी मध्यस्थता केली. त्यामुळे आरोपी बेलेकर आणि भोयर संतप्त झाले. त्यांनी नत्थू भोयर, विक्की भोयर, संजय भोयर, तुषार भोयर, अभिषेक भोयर, अरुण भोयर, स्वप्निल भोयर, रोहित भोयर, सौरभ भोयर, बंडू चौधरी आणि त्यांच्या साथीदारांनी वानखेडे यांच्या कार्यालयात सायंकाळी धाव घेतली. कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. तेथे काम करणारे ज्ञानेश्वर खडसे यांना मारहाण करून कार्यालयात तोडफोड केली. त्यानंतर प्रत्युत्तर देताना वासुदेव आणि ज्ञानेश्वर खडसे हे दोघे जखमी झाले. दरम्यान, कार्यालयात हल्ला झाल्याचे कळाल्याने वैशाली आणि किशोर वानखेडे तेथे पोहचले असता, आरोपींनी त्यांनाही कार फोडण्याची आणि मारण्याची धमकी दिली. माहिती कळताच हुडकेश्वर पोलीस गावात पोहचले. त्यांनी दोन्ही गटातील मंडळींना पोलीस ठाण्यात नेले. तेथे दोन्हीकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. पोलिसांनी वैशाली वानखेडे यांच्या तक्रारीवरून भोयर आणिसाथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.गावात तणावया प्रकारामुळे पिपळा गावात रविवारपासून प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तेथे काही वेळेपर्यंत बंदोबस्त लावला होता, मात्र नंतर तो काढून घेतला. त्यामुळे गावात तणावासोबतच दहशतही आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgram panchayatग्राम पंचायत