सावत्र बापाने मुलीचा केला लैंगिक छळ; आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 21:06 IST2018-12-31T21:04:26+5:302018-12-31T21:06:24+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोबाइलवर पॉर्न पाहत असे आणि जेव्हा कधी पत्नी घरी नसे तेव्हा मुलीवर लैंगिक अत्याचार करत असे. कल्याणमधील बाजारपेठ परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे.

सावत्र बापाने मुलीचा केला लैंगिक छळ; आरोपी अटकेत
कल्याण - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 52 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आतीक शेख असं या आरोपीचं नाव असून तो पीडित मुलीचा सावत्र बाप आहे. गेल्या तीन महिन्यापासून आरोपी मुलीवर बलात्कार करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोबाइलवर पॉर्न पाहत असे आणि जेव्हा कधी पत्नी घरी नसे तेव्हा मुलीवर लैंगिक अत्याचार करत असे. कल्याणमधील बाजारपेठ परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे.
पोलीस तक्रारीत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, 2008 मध्ये तिचा आतीक शेखसोबत विवाह झाला होता. आपल्या पहिल्या पतीपासून ही मुलगी झाली. ती सध्या दहावीत शिकत आहे. लैंगिक अत्याचार होत असल्या कारणाने तिच्या अभ्यासावरही परिणाम होत असून तिचं अभ्यासावर लक्ष लागत नाही आहे असं पीडित मुलीच्या आईने सांगितलं आहे. या घटनेची कुठेही वाच्यता केली तर आईला आणि तुझ्या मामाला मारुन टाकेन अशी धमकी आरोपीने दिल्याचं पीडित मुलीने सांगितलं आहे. ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा मुलीची आई तिला एका कार्यक्रमानिमित्त भावाच्या घरी घेऊन जाणार होती. आरोपीने मुलीला घेऊन जाण्यास नकार दिला. यामुळे मुलीच्या आईला संशय आला. ती परत आली तेव्हा मुलगी आजारी होती. तिने मुलीला भावाच्या घरी नेलं आणि चौकशी केली. यावेळी मुलीने आई आणि मामाला सगळा प्रकार सांगितला. मुलीच्या आईने तात्काळ एका एनजीओशी संपर्क साधत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.