१७ वर्षांनी लहान तरुणाच्या पडली प्रेमात; विरोध करणाऱ्या पतीचा असा काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:57 IST2025-01-13T18:52:25+5:302025-01-13T18:57:27+5:30
लग्न झालेल्या महिलेचं वयाने १७ वर्षांना लहान असलेल्या तरुणावर जीव जडला. पतीला हे कळताच त्याने विरोध केला आणि पत्नीने त्याचा जीवच घेतला.

१७ वर्षांनी लहान तरुणाच्या पडली प्रेमात; विरोध करणाऱ्या पतीचा असा काढला काटा
शिर कापलेला एक मृतदेह पोलिसांना मिळाला. हा मृतदेह कोणाचा आणि हत्या कोणी केली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. तपासाच्या अखेरीस या व्यक्तीच्या हत्येमागे त्याचीच पत्नीच निघाली. प्रियकराच्या मदतीने तिने पतीला संपवलं. त्यानंतर त्यांचे शिर कापले. इतकंच नाही. तर चेहरा ओळखू येऊ नये म्हणून नाकही कापलं होतं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजस्थानातील अलवर जिल्ह्यात ही घटना घडली. १० जानेवारी रोजी एक मृतदेह सापडला. मृतदेहाचे शिर कापलेले होते आणि नाकही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासातून हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव रामपाल मूलचंद मीणा असे समोर आले. व्यक्ती महुआ कला मालाखेडाची रहिवासी असल्याचे पोलिसांना कळले.
त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करून खंगाळून काढले. पोलिसांनी रामलालची पत्नी छोटी देवी हिची आधी चौकशी केली. चौकशीत तिने सगळी घटनाच पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी सांगितले की, छोटी देवीचे ठाणागाजी येथील रहिवासी असलेल्या सुभाष नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये मागील काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंध आहेत. छोटी देवी मजुरीचे काम करते. कामावर असतानाच तिची भेट सुभाषसोबत झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या संबंध प्रस्थापित झाले.
दोघेही पती-पत्नी सारखे राहू लागले
छोटी देवी आणि सुभाष हे दोघे रेवाडी भागातील बोवल परिसरात पती-पत्नी सारखे राहू लागले. याबद्दलची माहिती रामपाल आणि त्याच्या कुटुंबीयांना कळली. त्यांनी विरोध करायला सुरूवात केली. पतीचा काटा काढायचा असेल छोटी देवीने ठरवलं.
सुभाषसोबत मिळून तिने आधी रामलाल दारू पाजली. त्याला अकबरपूर गावातून उचलले आणि एका हॉटेलमध्ये नेऊन चार दिवस ठेवले. त्यानंतर दारू पिऊन दोघांनी रामपालचा गळा चिरला. त्यानंतर पोलीस ठाण्याजवळ मृतदेह फेकून दिला.
छोटी देवीपेक्षा सुभाष हा १७ वर्षांनी लहान आहे. महत्त्वाचं म्हणजे छोटी देवीला २० वर्षाचा मुलगा आहे. पाच वर्षांपूर्वी दोघांची एका कारखान्यावर काम करताना ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले.