शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

दारू दुकानदारास ब्लॅकमेलकरून खंडणी उकळणारे पितापुत्र अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:02 PM

पिता-पुत्राला पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले.

ठळक मुद्दे दारू दुकान नियमाबाह्यपणे बीडबायपासवर स्थलांतरीत केल्याची तक्रार

औरंगाबाद:   त्रिमूर्ती चौकातील सरकारमान्य दारू दुकान नियमाबाह्यपणे बीडबायपासवर स्थलांतरीत  केले असून तुमची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करतो,अशी धमकी देत दुकानमालकाकडून ५० हजार रुपये उकळल्यानंतर पुन्हा ३ लाख ९२ हजार रुपये खंडणी स्वरूपात घेताना पिता-पुत्राला पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई बीड बायपास रोडवर बुधवारी दुपारी करण्यात आली.  

जगन सुकाजी किर्तीशाही (५५,रा.संसारनगर) आणि मिलिंद जगन किर्तीशाही (३२)अशी अटकेतील आरोपी पिता-पुत्राचे नाव आहे. आरोपी जगन हे साप्ताहिक दैनिक जयभीम मिशनचे संपादक आहेत. याविषयी पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार प्रदीप लालचंद मणकानी (४९,रा. मित्रनगर)यांचे बीड बायपासवरल लक्की वाईन शॉप नावाचे देशी-विदेशी दारू विक्रीचे ी दुकान आहे. एक वर्षापूर्वी त्यांनी हे दुकान त्रिमूर्ती चौकातून बायपासवर स्थलांतरीत केले आहे. पंधरा दिवसापूर्वी  जगन हा प्रदीप यांच्या दारू दुकानात गेला. त्यावेळी त्याने माहिती अधिकारांतर्गत राज्य दारू उत्पादन शुल्क विभागाकडून मागविलेल्या माहितीची कागदपत्रे त्यांना दाखवून तो त्यांना म्हणाला की, देशी दारू दुकान एक किलोमिटरच्या आत असताना तुम्ही हे दुकान स्थलांतरीत कसे केले. तुमची तक्रार करील,असे धमकावत पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. 

जगनने तक्रार केल्यास पुन्हा त्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी वेळ जाईल, ही बाब लक्षात घेऊन प्रदीप यांनी ५ आॅक्टोबर रोजी जगनला पन्नास हजार रुपये दिले. तक्रार करू नको,अशी विनंती केली. दरम्यान आरोपींनी तक्रारदार यांचे भाऊ राजू मणकानी यांना फोन करून पैशाची मागणी केली.  आणि दुपारी २ वाजता बायपासवर पैसे घेऊन बोलावले आणि त्याबदल्यात तक्रारदार यांच्या दुकानासंबंधी फाईल  देतो, असे त्याने सांगितले. प्रदीप यांना आरोपीला खंडणी देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविली.

अन अडकले सापळ्याततक्रार प्राप्त होताच पोलीस उपायुक्त डॉ.राहुल खाडे, सहायक आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, विनायक कापसे, मीरा चव्हाण,  कर्मचारी मच्छिंद्र सोनवणे,  रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, राजेश यदमळ, जालिंदर  मांटे, रवी जाधव, नितेश जाधव, कमल तारे आणि माया उगले विशेष पोलीस अधिकारी स्वप्नील विटेकर यांच्या पथकाने बायपासवर सापळा रचला तेव्हा आरोपी पिता-पुत्राला प्रदीपयांच्याकडून खंडणी घेताना रंगेहात पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटक