वडिलांनी मुलाच्या शाळेच्या WhatsApp ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठवले, मग असे घडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 21:59 IST2021-09-20T16:29:11+5:302021-09-20T21:59:54+5:30
Obscene images and videos to the boy's school WhatsApp group :शाळेच्या WhatsApp ग्रुपवर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

वडिलांनी मुलाच्या शाळेच्या WhatsApp ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठवले, मग असे घडले
चेन्नई - तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये एक विचित्र घटना घडली. येथे एका 44 वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलाच्या शाळेच्या WhatsApp ग्रुपमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अश्लील व्हिडिओ पाठवल्याबद्दल मुख्याध्यापक संतापले
ही घटना अवडी, चेन्नईमध्ये घडली आहे. शाळेच्या WhatsApp ग्रुपवर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आरोपीचा मुलगा सहावीत शिकतो.
आरोपींवर पोलिसांची कडक कारवाई
पोलीस अधिकारी म्हणाले की आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
पोलिसांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली
शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले की, कोणाचेही असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्याचवेळी, पोलिसांच्या चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की, चुकून फोटो आणि व्हिडिओ मुलाच्या शाळेच्या WhatsApp ग्रुपवर गेले होते. ग्रुपवर फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यामागे माझा कोणताही हेतू नव्हता. जे काही घडले त्याची मला लाज वाटते.