गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टरसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 03:33 PM2019-12-04T15:33:37+5:302019-12-04T15:35:06+5:30

अटकपूर्व जामिनासाठी डॉक्टरची न्यायालयात धाव

Father-in-law files lawsuit against doctor-in-laws for abortion | गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टरसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टरसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

औरंगाबाद : माहेराहून अडीच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ करीत तिचा गर्भपात केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने पतीसह सासरची मंडळी व डॉक्टरांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पती किशोर सोपान भुजबळ, सासू लीला सोपान भुजबळ, सासरा सोपान विठ्ठल भुजबळ यांच्यासह डॉ. मोरे आणि डॉ. सरोज राठी यांचा समावेश आहे. दरम्यान, डॉ. सरोज राठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, यावर ६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

क्रांतीचौक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली किशोर भुजबळ (२०) हिचा ३० डिसेंबर २०१८ रोजी किशोर याच्याशी विवाह झाला. विवाहाच्या महिनाभरानंतर माहेराहून अडीच लाख रुपये आणावेत म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. सोनालीच्या वडिलांनी ५० हजार रुपये दिले. तरीही तिचा छळ सुरूच होता. दरम्यान, तिला गर्भ राहिला. सुरुवातीला एमआयडीसी वाळूज येथील डॉ. राहुल इंदे यांच्याकडे नेले. तेथे सहा आठवड्यांचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले व दोन आठवड्यांनी तपासणीसाठी बोलावले; परंतु सासरच्या लोकांनी पुन्हा डॉ. इंदे यांच्याकडे न नेता डॉ. मोरे यांच्याकडे नेले. त्याने अघोरी उपचार केले. त्यामुळे सोनालीच्या पोटात दुखू लागले. प्रचंड वेदना सुरू झाल्यावर डॉ. मोरे यांच्यामार्फत सरोज हॉस्पिटलमध्ये डॉ. सरोज राठी यांच्याकडे नेले. तेव्हा मे महिन्याचा शेवटा आठवडा होता. त्यानंतर तेथे इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचे सोनालीने फिर्यादीत म्हटले आहे. 

काही दिवसांनंतर तिला वेदना होऊ लागल्याने वडिलांनी  तिला वाळूजमध्ये खाजगी रुग्णालयात नेले. तेथे गर्भपात केल्याने त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सोनालीने पोलिसांत धाव घेतली; परंतु क्रांतीचौक पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे सोनालीने अ‍ॅड. दिलीप खंडागळे यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पती व सासरच्या मंडळींसह डॉ. मोरे आणि डॉ. सरोज राठीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार क्रांतीचौक पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गजानन सोनटक्के करीत आहेत.

Web Title: Father-in-law files lawsuit against doctor-in-laws for abortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.