कौटुंबिक वादातून पत्नीवर पतीने धारदार शस्त्राने केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 21:11 IST2021-11-29T21:10:43+5:302021-11-29T21:11:24+5:30

Murder Case :कौटुंबिक वादामुळे संतप्त झालेल्या नाजीम खान याने त्याची पत्नी रुबिनाच्या हाता,पायावर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी दुपारी खर्डी-दिवा रस्त्या जवळील ग्लोरियस गृहसंकुलासमोर घडली.

In a family dispute, the husband attacked his wife with a sharp weapon | कौटुंबिक वादातून पत्नीवर पतीने धारदार शस्त्राने केले सपासप वार

कौटुंबिक वादातून पत्नीवर पतीने धारदार शस्त्राने केले सपासप वार

मुंब्राः मागील सहा महिन्यापासून नवऱ्यासोबत राहत नसलेल्या पत्नीने त्याच्या बरोबर रहावे. यावरुन झालेल्या कौटुंबिक वादामुळे संतप्त झालेल्या नाजीम खान याने त्याची पत्नी रुबिनाच्या हाता,पायावर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी दुपारी खर्डी-दिवा रस्त्या जवळील ग्लोरियस गृहसंकुलासमोर घडली.

तुझ्या आईला जामीन मिळवून देतो, अशी बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

संतप्त पतीला वार करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक जागृक नागरीकांवरही त्याने चाल केली.यामुळे संतप्त होऊन त्यांनी त्याला मारहाण केली.या घटनेमध्ये दोघे तसेच आणखी एकजण जखमी झाला.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शिळ-डायघर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलफरोज मुजावर यांनी लोकमतला दिली.

दारू पाजून पतीने मित्रासह पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

 

Web Title: In a family dispute, the husband attacked his wife with a sharp weapon