दारू पाजून पतीने मित्रासह पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 06:39 PM2021-11-29T18:39:04+5:302021-11-29T21:39:59+5:30

Gangrape Case : पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध भादंवि कलम ३७६(२), ३७६ (ड), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली.

Husband gang-raped wife with friend after gave her alcohol | दारू पाजून पतीने मित्रासह पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

दारू पाजून पतीने मित्रासह पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

Next

मुंबईत एका व्यक्तीने आपल्याच पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६(२), ३७६ (ड), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली.

मुंबईपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाची पार्टी आहे, असे सांगून आरोपी पती शुक्रवारी पत्नीला मित्राच्या घरी घेऊन गेला, मित्राच्या घरी गेल्यानंतर आरोपी पतीने पत्नीला दारू पाजली. दारू प्यायल्यानंतर पत्नी बेशुद्ध पडली, काही तासांनंतर शुद्धीवर आल्यावर तिने पाहिले की, तिच्या अंगावरील कपडे अस्तावस्त झाले होते. त्याबाबत जाब विचारला असता पती आणि त्याच्या मित्राने तिला तू कोणाशी याबाबत बोललीस तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. 

घरी गेल्यानंतर पत्नीने याबाबत पतीसोबत खूप भांडण केले आणि घरच्यांना सांगितले. ही बाब समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी नजीकचे पोलीस ठाणे गाठून आरोपी पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.  गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पती आणि तिच्या मित्राला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Husband gang-raped wife with friend after gave her alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app