पोलीस आहे सांगून वृद्धाला घातला गंडा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 18:57 IST2018-08-14T18:54:13+5:302018-08-14T18:57:02+5:30

मी पोलीस आहे, तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून वृद्ध व्यक्तीला १०हजार ३७० रुपयांचा गंडा घालणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

fake police cheated old man at Sahakar nagar | पोलीस आहे सांगून वृद्धाला घातला गंडा !

पोलीस आहे सांगून वृद्धाला घातला गंडा !

पुणे :  मी पोलीस आहे, तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून वृद्ध व्यक्तीला १०हजार ३७० रुपयांचा गंडा घालणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

    याबाबत अधिक माहिती अशी की, नवनाथ लोकरे (वय ६६) हे कात्रजला राहतात. काल (दि.१३) रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास  स्वाती सोसायटीच्या जवळील रस्त्याने जात होते. त्यावेळी बदामी जॅकेट आणि खाकी पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने त्यांना अडवले. त्या व्यक्तीने लोकरे यांना मी पोलीस असून मला आपली झडती घ्यायची आहे असे सांगितले. त्यावर लोकरे यांनी परवानगी दिली असता झडती घेता संबंधित व्यक्तीने त्यांच्या शर्टाच्या चोर कप्प्यातील पैसे काढून घेऊन घेतले. या संदर्भात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. 

Web Title: fake police cheated old man at Sahakar nagar