फेसबुक मित्राने तरुणीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 19:53 IST2019-01-04T19:50:56+5:302019-01-04T19:53:50+5:30

फेसबुक मित्र सोनू आणि त्याच्या भावाने मिळून आपल्यावर बलात्कार केला असे पीडित तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

Facebook friend raped by the girl | फेसबुक मित्राने तरुणीवर केला बलात्कार

फेसबुक मित्राने तरुणीवर केला बलात्कार

ठळक मुद्देपीडित तरुणीची सोनूबरोबर फेसबुकवरुन ओळख झाली होती.आरोपी सोनूने आपल्याला हॉटेलमधल्या रुमवर बोलावले.२३ वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका २३ वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. फेसबुकवरून झालेल्या ओळखीतून हा धक्कादायक प्रकार घडला आहे. फेसबुक मित्र सोनू आणि त्याच्या भावाने मिळून आपल्यावर बलात्कार केला असे पीडित तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

पीडित तरुणीची सोनूबरोबर फेसबुकवरुन ओळख झाली होती. आरोपी सोनूने आपल्याला हॉटेलमधल्या रुमवर बोलावले. त्याठिकाणी लैंगिक शोषण करून चित्रीकरणही केले. सोनू लग्नासाठी जबरदस्ती करण्यासाठी या चित्रीकरणाचा वापर करत होता असे पीडित महिलेने म्हटले आहे. सोनूने त्याचा धर्म सुद्धा आपल्यापासून लपवून ठेवला असे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. शामलीचे पोलीस अधीक्षक अजय पांडे यांच्या आदेशावरुन सोनू आणि त्याच्या १० कुटुंबियांविरोधात दंड विधान संहितेच्या विविध कलमातंर्गत तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Facebook friend raped by the girl