Exciting! Murder of Former Shiv Sena city president Rahul Shetty in Lonavla; Two murders in 24 hours | खळबळजनक! लोणावळ्यात माजी शिवसेना शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची निर्घृण हत्या; २४ तासांत दोन खून 

खळबळजनक! लोणावळ्यात माजी शिवसेना शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची निर्घृण हत्या; २४ तासांत दोन खून 

ठळक मुद्देएकामागोमाग एक घडलेल्या या घटनांनी लोणावळा शहरात भीतीचे वातावरण

लोणावळा : शिवसेना माजी शहरप्रमुख व शिवसेना संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांची आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर जयचंद चौकात निर्घृण हत्या करण्यात आली.
    मिळालेल्या माहितीनुसार, शेट्टी यांच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून तीन गोळ्या झाडल्या आहेत. त्यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात हालविण्यात आले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. 
   दसर्‍याच्या रात्री हनुमान टेकडी येथील गणेश नायडू या युवकांचा देखील धारदार शस्त्रांनी वार करून खून झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांनी लोणावळा शहर हादरून गेले आहे. मागील चार पाच दिवसापुर्वीच लोणावळ्यात सुरज आगरवाल नामक युवकाला दोन गावठी पिस्टल, कोयता व चाकू ह्या हत्यारांसह पकडला होता. एकामागोमाग एक घडलेल्या या घटनांनी लोणावळा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 
   दरम्यान शेट्टी यांच्या हत्या प्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. परमार रुग्णालयाच्या बाहेर शेट्टी सर्मथकांनी मोठी गर्दी केली होती

Web Title: Exciting! Murder of Former Shiv Sena city president Rahul Shetty in Lonavla; Two murders in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.