शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री, मित्राचा मृत्यू आणि आता बदला; मुलीच्या लग्नासाठी आलेल्या माजी NSG कमांडोची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:51 IST

हरियाणात एका माजी एनएसची कमांडोची पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली.

Haryana Crime: हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ३० एप्रिलच्या सकाळी एका खळबळजनक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका माजी एनएसजी कमांडोची भरबाजारात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, मृत व्यक्ती एका माजी सरपंचाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होती आणि नुकतीच पेरोलवर बाहेर आली होती.

ही घटना गुरुग्रामच्या कासन भागातील आहे. ५५ वर्षीय मृत सुंदर हे ३० एप्रिलच्या सकाळी ६ ते ७ च्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरायला निघाले होते. ते एका चौकात उभे असताना अचानक दोन हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी सुंदर यांच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यात हल्लेखोर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसत आहेत. गोळीबारानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. सुंदर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुलीच्या लग्नासाठी आला होता पेरोलवर

सुंदर यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीचे लग्न २० एप्रिल रोजी पार पडले होते. याच लग्नासाठी सुंदर पेरोलवर (रजा) बाहेर आले होते. कार्तिक (वय २०) आणि त्याचा साथीदार गुलशन (वय २२) अशी संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत.

बदल्याची पार्श्वभूमी

या हत्याकांडाची मुळे ८ वर्षे जुन्या एका वादात आहेत. मृत सुंदर आणि ज्याची हत्या झाली होती ते माजी सरपंच बहादूर यांच्यात घनिष्ट मैत्री होती. २०१८ मध्ये पैशांच्या व्यवहारावरून या दोन्ही मित्रांमध्ये मोठा वाद झाला. या वादातून सुंदर यांनी सरपंच बहादूर यांची हत्या केली आणि स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले होते. याच हत्येचा बदला घेण्यासाठी कार्तिकने सुंदर यांची हत्या केल्याचा आरोप पत्नीने केला.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

घटनेनंतर आरोपी कार्तिक आणि त्याचा साथीदार फरार झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-NSG Commando Killed: Revenge Motive Suspected After Daughter's Wedding

Web Summary : In Gurugram, an ex-NSG commando, recently out on parole for his daughter's wedding, was shot dead. The killing is suspected to be revenge for a 2018 murder of a village leader. Police are searching for the suspects.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिस