उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील अहिबरनपुरा गावात रविवारी पुष्पा देवी नावाच्या महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. पुष्पा देवीच्या दिराची वरात दोन दिवसांनंतर निघणार होती. मात्र तिने हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे लग्नाच्या घरात आनंदाऐवजी शोकाकुल वातावरण पसरलं आहे. मृत महिलेचा पती शेर सिंह याने सांगितलं की, त्याच्या भावाचं लग्न ठरल्यामुळे पुष्पा प्रचंड नाराज होती. लग्नाची वरात १० फेब्रुवारी रोजी निघणार होती.
शेर सिंहने खळबळजनक दावा करताना सांगितलं की, "माझ्या पत्नीचे माझ्या लहान भावाशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि त्यांच्यातील जवळीक सतत वाढत होती. याच कारणामुळे आम्ही लहान भावाला गावाबाहेर कामासाठी पाठवून दिलं होतं. माझी पत्नी वेगळ्या घरात राहत होती. आम्हाला १० आणि ७ वर्षांची दोन मुलं आहेत, तरीही ती त्याला भेटत असे."
शेर सिंह पुढे म्हणाला की, "लहान भावाचं लग्न ठरल्याने तो गावी आला होता. तो आल्यावर माझी पत्नी त्याला भेटायला त्याच्या घरी गेली होती. तिथे त्या दोघांमध्ये मोठा वाद आणि जोरदार भांडण झालं. त्यानंतर घरी परतल्यावर पत्नीने गळफास लावून घेतला. जेव्हा माझ्या मुलांनी तिला फासावर लटकलेलं पाहिलं, तेव्हा ती रडू लागली."
मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेर सिंह आणि इतर नातेवाईक तिथे पोहोचले. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा देवी नावाच्या महिलेने घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. नातेवाईकांशी चर्चा केल्यावर असे समोर आलं की, दिराचं लग्न ठरल्याने ती नाराज होती. पुष्पाचं २०११ मध्ये शेर सिंहसोबत लग्न झालं होतं. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a woman, upset about her brother-in-law's upcoming wedding, committed suicide. Allegedly, she had a relationship with him, leading to family disputes and her tragic decision. Police are investigating the case.
Web Summary : उत्तर प्रदेश में देवर की शादी से नाराज़ एक महिला ने आत्महत्या कर ली। आरोप है कि उसका देवर के साथ संबंध था, जिसके कारण पारिवारिक विवाद हुए और उसने दुखद फैसला लिया। पुलिस मामले की जांच कर रही है।