आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 15:38 IST2020-08-04T15:37:31+5:302020-08-04T15:38:54+5:30
प्राथमिक तपास उपनिरीक्षक गणेश कोळी, निलेश भावसार व संदीप धनगर करीत आहेत.

आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या
जळगाव : रामेश्वर कॉलनीतील हनुमान नगरात राहणाऱ्या मालबाई जानराव वावरे (६५) या वृध्देने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मालबाई यांना पोटाचा अल्सर होता. त्यामुळे ते सतत नैराश्यात होत्या. मंगळवारी सकाळी त्यांनी राहत्या घरातच गळफास घेतला. हा प्रकार मुलाच्या लक्षात आला, त्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता ९.३५ वाजता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास उपनिरीक्षक गणेश कोळी, निलेश भावसार व संदीप धनगर करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा
थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या