बालदिनीच आठ वर्षीय वृषभचा मृत्यू, घटनेनं सर्वत्र हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 16:43 IST2018-11-14T16:41:15+5:302018-11-14T16:43:02+5:30
नालासोपारा परिसरातील वृषभ विश्वकर्माचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.

बालदिनीच आठ वर्षीय वृषभचा मृत्यू, घटनेनं सर्वत्र हळहळ
नालासोपारा - वृषभ विश्वकर्मा या 8 वर्षीय चिमुकल्याचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नालासोपारा परिसरातील वृषभ विश्वकर्माचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. वृषभ काल संध्याकाळपासून बेपत्ता झाला होता. आज सर्वत्र बालदिन साजरा होत असताना, चिमुकल्या वृषभच्या मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नालासोपारा येथील अग्रवाल नगरी रोड नंबर 4 च्या ठिकाणी त्याचा मृतदेह आज सापडला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.