शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

ईडीची कारवाई! दाऊद इब्राहिमच्या ब्रिटनमधील मालमत्तेचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 9:54 PM

बिंद्रा, युसूफच्या चौकशीतून महत्वपूर्ण माहिती

ठळक मुद्देदाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरारी असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले होते. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यातर्गंत दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये दोघेजण चौकशीसाठी हजर होत नव्हते.

मुंबई - गेल्या अडीच दशकापासून फरारी असलेल्या दाऊद इब्राहिमच्या देशभरात विविध ठिकाणी व ब्रिटनमध्ये असलेल्या बेनामी मालमत्तबाबत सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) महत्वपूर्ण महिती हाती लागली आहे. दिवगंत गँगस्टर इकबाल मिर्चीच्या अटक केलेल्या 2 दलालांकडील चौकशीतून हा उलगडा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मिर्चीच्या मुंबईतील कोट्यावधीच्या मालमत्तेच्या विक्रीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने दिल्लीतून रणजित सिंग बिंद्रा व हारुण अलीम युसूफ यांना शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करुन मालमत्तेच्या जप्तीची कारवाई केली जाईल, असे ईडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरारी असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले होते. त्याने १९८६मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यातर्गंत दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये दोघेजण चौकशीसाठी हजर होत नव्हते. त्यांना दिल्लीतून अटक केल्यानंतर चौकशी केली असता दाऊदच्या देशात व ब्रिटनमध्ये असलेल्या मालमत्तेची माहिती मिळाली, त्याबाबत आतापर्यत सरकारकडे काहीही माहिती नव्हती, त्यामुळे दोघांकडून मिळालेल्या माहितीची छाननी करण्याचे काम सुरु आहे. त्याची पडताळणी झाल्यानंतर त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसArrestअटक