मित्राच्या वाढदिवसासाठी आलेल्या नाशिकच्या चेतनचा मोबाईल चोरीच्या घटनेत दुर्दैवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 17:20 IST2018-08-30T16:56:44+5:302018-08-30T17:20:27+5:30

कळवा रेल्वे स्थानकावरील मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपीला अटक 

Due Mobile robbery Unfortunate death of Chetan of Nashik who came for his friend's birthday | मित्राच्या वाढदिवसासाठी आलेल्या नाशिकच्या चेतनचा मोबाईल चोरीच्या घटनेत दुर्दैवी मृत्यू 

मित्राच्या वाढदिवसासाठी आलेल्या नाशिकच्या चेतनचा मोबाईल चोरीच्या घटनेत दुर्दैवी मृत्यू 

ठाणे -  रेल्वे लोकलच्या प्रवासात मोबाइल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या मोबाइल चोरीच्या घटना नाशिकच्या चेतन अहिरराव (वय 35) या व्यक्तिच्या जीवावर बेतला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी एका सीसीटिव्ही फुटेजच्याआधारे बुधवारी अटक केली. आरोपीचे नाव अजय सोलंकी (वय 19) असे असून तो कळवा येथे राहतो. त्याच्याकडून चोरीचा मोबाइल हस्तगत केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली. आरोपीला 3 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. चेतन हा मूळ नाशिकचा असून तो 19 ऑगस्ट रोजी ठाण्यातील मित्राच्या वाढदिवसासाठी दिव्यातील नातेवाईकांकडे आला होता. त्याचदिवशी मित्राचा वाढदिवस झाल्यानंतर ठाण्यातून पुन्हा दिव्यात लोकलने जात होता. मात्र, मध्यरात्री 12.54 वाजता कळवा रेल्वे स्थानकात सोलंकी या आरोपीने चालत्या लोकलमधून दरवाज्यात उभा असलेल्या चेतनच्या हातातून मोबाइल फटका मारून फलाटावर पाडला. त्याचदरम्यान धावत्या लोकलमधून चेतन कल्याणच्या दिशेने फलाट संपल्यानंतर खाली पडला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अपघाताची नोंद केली होती. कळवा रेल्वे स्थानकातील सीसीटिव्हीमध्ये या मोबाइल चोरीचा प्रकार कैद झाला. त्यानुसार आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. 

Web Title: Due Mobile robbery Unfortunate death of Chetan of Nashik who came for his friend's birthday