सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर दारुड्या तरुणाचा धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 20:58 IST2018-11-09T20:57:04+5:302018-11-09T20:58:04+5:30

सुरेश राजाराम पवार (वय २८) असे या तरुणाचे नाव असून वडाळा रेल्वे पोलिसांनी या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

The drunken teenager at the Sandhurst Road railway station | सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर दारुड्या तरुणाचा धिंगाणा

सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर दारुड्या तरुणाचा धिंगाणा

मुंबई - हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांवर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दारुड्या तरुणाने धिंगाणा घालत स्टेशन मास्टर कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. सुरेश राजाराम पवार (वय २८) असे या तरुणाचे नाव असून वडाळा रेल्वे पोलिसांनी या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

मद्यधुंद अवस्थेतील तरुण सँडहर्स्ट रोड स्थानकावर पडला होता असून त्याच्या आजूबाजूला बॅग असल्याची माहिती पाँईंट्समनने स्टेशन मास्टरास दिली. या तरुणाच्या अस्थावस्थ पडलेल्या बॅगा चोरी होऊ नये म्हणून पॉईंटसमन आणि स्टेशन मास्टर यांनी त्याला शुद्धीत आणून स्थानक कार्यालयात आणले. मात्र, शुद्धीत आल्यानंतर तरुणाने पॉईंट्समन आणि स्टेशन मास्टर कार्यालयात शिवीगाळ करत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला थांबण्याचा प्रयत्न केला असता तरुणाने त्यांच्यावर हात उगारला. या  गोंधळात स्लाईडिंगच्या तिकिट खिडकीचे, टेबल, खुर्च्या यांचे नुकसान झाले.  या वेळी कार्यालयाबाहेर बघ्यांची गर्दी जमा झाली होती. रेल्वे पोलिसांनी आरपीएफ जवानांच्या मदतीने त्या तरुणाला बेड्या ठोकल्या असून मद्यधुंद अवस्थेतील तरुणावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलीसांनी दिली.   

Web Title: The drunken teenager at the Sandhurst Road railway station