गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:18 IST2025-10-06T13:13:38+5:302025-10-06T13:18:56+5:30
Rave Party Busted: ट्रॅप हाऊस पार्टी अशी जाहिरात करून आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. यात २२ अल्पवयीन मुलांसह तब्बल ६५ जणांना ताब्यात घेण्यात आले.

गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
Rave Party Latest News: एका फार्म हाऊसमध्ये ६५ जणांचा गोंधळ सुरू होता. ड्रग्ज, गांजा, दारूचे सेवन करून नंगानाच सुरू असताना पोलिसांच्या विशेष मोहीम पथकाने धाड टाकली. नको त्या अवस्थेत असलेल्या ६५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात २२ जण अल्पवयीन मुले असून, १२ महिलांचा समावेश आहे. ड्रग्ज तस्करीची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
तेलंगणातील मोईनाबाद शहराजवळील एका फार्म हाऊसमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. ट्रॅप हाऊस पार्टी अशा मेसेज सोशल मीडियावर पाठवून या पार्टीची जाहिरात करण्यात आली होती. ही पार्टी द ओक फार्म हाऊसवर आयोजित केलेली होती.
रेव्ह पार्टीत १२ मुली, ५ जणी अल्पवयीन
फार्म हाऊसवर ड्रग्ज पार्टी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पार्टी रंगात आलेली असतानाच धाड टाकली. त्यावेळी नशेत असलेले ६५ जण नको अवस्थेत धिंगाणा घालत होते.
पार्टीत २२ जण अल्पवयीन होते. १२ तरुणीही पार्टीला आलेल्या होत्या, त्यापैकी ५ जणी या अल्पवयीन आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
इशान नावाच्या व्यक्तीने ही पार्टी आयोजित केली होती. यात काही जणांनी गांजाचे सेवन केलेले असल्याचे रक्ताच्या चाचणीतून निष्पन्न झाले.
मोईनाबादचे पोलीस महानिरीक्षक पवन कुमार रेड्डी यांनी सांगितले की, इशान हा एका खासगी महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. तो नियमित ड्रग्जचे सेवन करत असल्याचा संशय आहे. त्याचे वडील सध्या कॅनडात राहतात. तो २०२४ मध्ये भारतात शिक्षणासाठी आलेला आहे.
इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून प्रचार
या रेव्ह पार्टीची जाहिरात इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आली होती. ट्रॅप हाऊस. ९एमएम अशी जाहिरात हैदराबादमधील डीजेकडून करण्यात आली होती. सायंकाळी ६ ते पहाटे २ पर्यंत ही पार्टी चालणार होती. यासाठी एका व्यक्तीसाठी १६०० रुपये तर जोडप्यांसाठी २८०० रुपये फीस ठेवलेली होती. या सगळ्यांविरोधी एनपीडीएस कायद्यातील कलमान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.